`मानसिकदृष्ट्या हे त्रासदायक...` मेलबर्नमधील पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा?
IND VS AUS 4th Test : मेलबर्न टेस्ट सीरिज जिंकणं हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्वबळावर पोहोचण्याकरता भारतासाठी अत्यंत महत्वाचं होतं.
IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज सुरु असून यातील चौथा सामना मेलबर्न येथे पार पडला. मेलबर्न टेस्टमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 184 धावांनी विजय मिळवला. तसेच सीरिजमध्ये 1-2 अशी आघाडी मिळवली. मेलबर्न टेस्ट सीरिज जिंकणं हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्वबळावर पोहोचण्याकरता भारतासाठी अत्यंत महत्वाचं होतं. परंतू भारताचा यात दारुण पराभव झाल्याने WTC फायनलचं समीकरण आता वेगळं असणार आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 26 ते 30 डिसेंबर दरम्यान चौथा टेस्ट सामना खेळवला गेला. यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हे आव्हान पूर्ण करणं टीम इंडियाच्या फलंदाजांना शक्य झालं नाही. टीम इंडियाकडून केवळ यशस्वी जयस्वालने 84 धावांची कामगिरी केली तर ऋषभ पंत 30 धावा करून बाद झाला. तर इतर कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या सुद्धा करता आली नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांकडून मोठ्या धावांची अपेक्षा असताना विराट 5 तर रोहित 9 धावांवर बाद झाला. त्यामुळे फॅन्सची देखील निराशा झाली. तर 340 धावांचं लक्ष असताना टीम इंडिया केवळ 155 धावा करून ऑल आउट झाली.
रोहित शर्मा काय म्हणाला?
मेलबर्न टेस्टमध्ये पराभूत झाल्यावर रोहित शर्मा पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला की, "मी आज जिथे उभा आहे तिथे आहे. कर्णधार आणि फलंदाज म्हणून मनाप्रमाणे काही निकाल मिळाले नाहीत आणि ते निराशाजनक आहे. ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणारे आहे. एक संघ म्हणून काही गोष्टींकडे पाहणं आवश्यक आहे ते मी पाहीन. सिडनी टेस्टमध्ये आम्हाला संधी आहे की आम्ही कमबॅक करू शकू. आम्ही त्यासाठी प्रयत्न करू आणि चांगला खेळ खेळू".
हेही वाचा : यशस्वी जयस्वालच्या विकेटवरून वाद, गावसकर अंपायरवर भडकले, मेलबर्न टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?
भारतीय संघाची प्लेईंग 11 :
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप