मुंबई: अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांची जोडी टीम इंडियामध्ये फलंदाजीसाठी फारच चर्चेत असते. मात्र अजिंक्य रहाणेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची माफी मागावी लागली होती. नेमका त्यावेळी काय घडलं होतं? का मागावी लागली होती माफी? राहाणेची खरंच चूक होती का? या सर्व गोष्टींचा खुलासा अजिंक्य रहाणेनं केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाचा हा किस्सा आहे. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली क्रीझवर खेळत होते. डाव उत्तम रंगात आला असताना एक चूक महागात पडली आणि घोळ झाला. या चुकीबद्दल अजिंक्यने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची माफी मागितली होती. कोहलीने त्यावेळी चांगल्या फॉर्ममध्ये होता. 



क्रीझवर 74वा रन काढण्यासाठी विराट कोहली आणि राहाणे धावणार तेवढ्यात दोघांच्या संवादात घोळ झाला आणि त्यादरम्यान रहाणेमुळे विराट कोहली आऊट झाला. त्यावेळी संध्याकाळी खेळ संपल्यानंतर अजिंक्य रहाणेनं स्वत: घडलेल्या प्रकाराबद्दल विराटची माफी मागितली होती.


'आम्ही खूप मस्त खेळत होतो. कोहली देखील चांगल्या फॉर्ममध्ये होता. कोहली रन आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचं पारडं जड झालं होतं. त्यावेळी काय परिस्थिती झाली हे आम्ही दोघांनाही समजलं. क्रिकेटच्या मैदानात अनावधानाने अशा गोष्टी होत असतात. त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यायची. झालेल्या चुका मागे ठेवून पुढे जायचं', असंही अजिंक्य रहाणेनं स्पष्टीकरण दिलं होतं.