IND vs AUS : चौथ्या टेस्टपूर्वीच कर्णधार बदलला; आता `हा` खेळाडू सांभाळणार टीमची कमान
आता टीमच्या कर्णधापदाबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. यावेळी चौथ्या टेस्टसाठी टीमचा कर्णधार बदलण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. या सिरीजच्या तिसऱ्या सामन्याचा शुक्रवारी निकाल लागला. यावेळी कांगारूंनी टीम इंडियाचा तिसऱ्या दिवशी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने भारताचा पराभव केला. मात्र यानंतर आता टीमच्या कर्णधापदाबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. यावेळी चौथ्या टेस्टसाठी टीमचा कर्णधार बदलण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बदलणार
पॅट कमिंसच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया टीमची धुरा स्टीव स्मिथ (Steve Smith) ने सांभाळली आणि विजय देखील मिळवला. मात्र आता चौथ्या टेस्टची धुरा पुन्हा एकदा पॅट कमिंस सांभाळणार असल्याचे संकेत स्मिथने दिलेत.
या सिरीजमधील चौथा आणि शेवटचा सामना 9 मार्च रोजी अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. ज्यासाठी तिसऱ्या टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार त्याची आजारी आई आजारी असल्याने मायदेशी परतला होता. यामुळे तिसऱ्या टेस्टसाठी तो अनुपस्थितीत होता. मात्र चौथ्या टेस्टसाठी तो उपलब्ध असेल, असे संकेत स्मिथकडून देण्यात आले आहेत.
तिसरा सामना जिंकल्यानंतर स्मिथ म्हणाला, 'ही पॅट कमिन्सची टीम आहे आणि तोच या सिरीजचं पुढे नेतृत्व करणार आहे." स्टीव्ह स्मिथच्या बोलण्याच्या अर्थानुसार, त्याने कर्णधारपद सोडलं असून 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये होणाऱ्या सिरीजमधील चौथ्या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात पॅट कमिन्स टीमचं नेतृत्व करू शकतो.
तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय
तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 विकेट्सने पराभव केला आहे. (IND vs AUS 3rd Test) या कसोटी विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. (Test Cricket News) दरम्यान, चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2 -1 अशी आघाडी कायम ठेवली आहे. या विजयामुळे चौथ्या कसोटीत चुसर निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कांगारुंसाठीही ही कसोटी मालिका 2 -2 अशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर टीम इंडिया चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.
इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या 76 धावांचे टार्गेट ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने केवळ एक गडी गमावून सहज गाठले. इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी टीम इंडिया अपयशी ठरली आहे. रोहित टीमचे सर्व 'प्लानिंग' फोल ठरले चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
WTC Final 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचं स्थान पक्कं
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या टीमने या विजयासह फायनलमध्ये स्थान पक्कं केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात आता 68.52 पॉईंट्स झाले आहेत.