भारताचा ९९ धावांत धुव्वा; ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकावर कब्जा
WT20 World Cup
मेलबर्न : महिला टी-२० वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये WT20 World Cup ऑस्ट्रेलियाने भारताला ८५ धावांनी हरवलं आहे. या जबरदस्त विजयानंतर ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने २० ओव्हरमध्ये ४ विकेटच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या. भारताकडे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी १८५ धावांचं आव्हान होतं. मात्र, भारतीय संघ अवघ्या ९९ धावांमध्येच गारद झाला.
ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या नावे केली. ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचला होता. तर भारतीय संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये खेळला.
भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ३३ धावा केल्या. त्याशिवाय वेदा कृष्मामूर्तीने १९, रुचा घोषने १८, स्मृती मंधाना ११ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेगन स्कटने चार आणि जेस जोनासनने तीन तर सोफी मोलिन्यूक्स, डेलिसा किमिंस आणि निकोला कॅरीने एक-एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाने बेथ मूनीने सर्वाधिक ७८ धावा केल्या. तर एलिसा हिलीने ३९ बॉलमध्ये ७५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने २०१०, २०१२, २०१४ आणि २०१८ मध्येही टी-२० विश्वचषक जिंकला होता.
ठळक अपडेट्स -
भारत ९९/१० ओव्हर (२०)
- दीप्ती शर्मा ३३ धावांवर बाद
- राधा यादव १ रन करुन आऊट
- शिखा पांडे २ धावा करुन तंबूत
- रिचा घोष १८ धावांवर आऊट
- रिचा घोष मैदानात
- वेदा कृष्णमूर्ति २४ बॉलमध्ये १९ धावांवर माघारी
- वेदा कृष्णमूर्ति मैदानात
- हरमनप्रितकौर ४ धावांवर बाद
- दीप्ती शर्मा मैदानात
- भारताला तिसरा धक्का; स्मृती मंधाना ११ धावांवर आऊट
- हरमनप्रितकौर मैदानात
- जेमिमा रॉड्रिग्ज शून्य धावांवर आऊट
- जेमिमा रॉड्रिग्ज मैदानात
- भारताला पहिला धक्का, शेफाली वर्मा २ धावांवर बाद
- भारतीय संघासमोर विजयासाठी १८५ धावांचे आव्हान
ऑस्ट्रेलिया १८४/४
- ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज सुरुवात, पहिल्याच षटकात २४ धावा
- ४ ओव्हरमध्ये ३७ धावा
- ६व्या ओव्हरमध्ये अर्धशतक
- ८ ओव्हरमध्ये ७५ धावा
- एलिसा हीली, ३० बॉलमध्ये ५० धावांचा टप्पा पार
- बेथ मूनी (३७) एलिसा हीली (५७)
- एलिसा हीली ७ चौकार, २ षटकार
- ऑस्ट्रेलियाचं दमदार शतक
- ऑस्ट्रेलियाला पहिला झटका, एलिसा हीली ७५ धावा करुन आऊट
- मेग लैनिंग मैदानात
- बेथ मूनी ४२ बॉलमध्ये अर्धशतक
- बेथ मूनी (६०) मेग लैनिंग (१५)
- ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट, कॅप्टन मेग लैनिंग आऊट
- एश्ले गार्डनर मैदानात
- ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट, एश्ले गार्डनर २ धावा करुन आऊट
- रचेल हेन्स मैदानात
- रचेल हेन्स ४ धावा करुन आऊट
- ऑस्ट्रेलिया १८४/४ ओव्हर (२०)
- भारतासमोर विजयासाठी १८५ धावांचं आव्हान