IND vs Aus 1st Test BGT 2024-25 Plying 11 :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, पर्थ कसोटी आज शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता सुरू होईल.  रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कमान कार्यवाहक कर्णधार जसप्रीत बुमराह सांभाळत आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचे ओपनिंग कॉम्बिनेशन आणि प्लेइंग-11 काय असेल? हा एक मोठा प्रश्न आहे. चला आजच्या या महत्त्वपूर्ण आणि बहुचर्चित सामन्याची प्लेइंग-11 जाणून घेऊयात. 


पर्थमध्ये असेल वेगवान गोलंदाजांचा दबदबा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पर्थची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त ठरली आहे. येथील ट्रॅक चेंडूचा वेग आणि उसळी यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर खेळ जसजसा पुढे सरकतो, तसतशी फिरकी गोलंदाजांनाही खेळपट्टीकडून थोडीफार मदत मिळू लागते. त्यामुळे दोन्ही संघ त्यांच्या प्लेइंग-11 मध्ये किमान एक तरी फिरकीपटू निश्चितपणे समाविष्ट करतील. 


भारताची  प्लेइंग इलेव्हन 


केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (w), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (क), मोहम्मद सिराज.



ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन


 


उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (डब्ल्यू), पॅट कमिन्स (सी), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड


 



 पहिला सामना कधी सुरू होईल?



भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी म्हणजेच सकाळी ७.२० वाजता नाणेफेक होईल.


कोणत्या टीव्ही चॅनलवर बघता येणार सामना?



भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत.


 सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघता येईल? 



भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डिस्ने हॉटस्टार ॲपवर (Disney+ Hostar) ऑनलाइन पाहता येईल.