IND vs AUS: संघातून `या` 3 खेळाडूंना रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता; मोठे खेळाडू Out, मग संधी कुणाला?
India vs Australia, 3rd ODI: कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णघ घेत संघात फेरबदल करण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं हे मोठे बदल कोणते असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
India vs Australia, 3rd ODI: भारतीय क्रिकेट (Team India) संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर क्रिकेटप्रेमींचं सातत्यानं लक्ष असतं. दिग्गज खेळाडू असो किंवा मग एखादा नवखा खेळाडू, संघात स्थान मिळताच ही मंडळी आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवतात का? हेच महत्त्वाचं ठरतं. काहींना यात यश मिळतं, काही मात्र सपशेल अपयशी ठरतात. अशाच काही खेळाडूंबद्दल सध्या सुरु असणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेदरम्यानच कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठे निर्णय घेऊ शकतो. (IND vs AUS Captain rohit sharma to make three big changes before final match latest sports news)
ऑस्ट्रेलियाविरोधातील तीन सामन्यांच्या मालिकेमधील दुसऱ्या सामन्यात संघातील तीन खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. ज्यामुळं मायदेशी पराभव पचवण्याच्या मनस्थितीत रोहित आणि संपूर्ण संघच नाही. तेव्हा बुधवारी होणाऱ्या सामन्यातून संघातून 3 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे.
संघातून कोण OUT?
ऑस्ट्रेलियाविरोधातील अंतिम आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यातून रोहित ज्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो तो आहे, सूर्यकुमार यादव. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्यामुळं त्याच्याजागी सूर्यकुमारला संघात स्थान देण्यात आलं होतं. पण, दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं समाधानकारक कामगिरी केली नाही. त्यामुळं त्याच्याऐवजी ईशान किशनला संघात स्थान मिळू शकतं.
दुसरा खेळाडू म्हणजे कुलदीप यादव. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीपनं एका षटकामध्ये 12 धावा दिल्या होत्या. फलंदाजीतही तो अपयशी ठरला. त्यामुळं त्याच्या जागी रोहित उमरान मलिकला संधी देईल असं म्हटलं जात आहे. तिसरा खेळाडू म्हणजे अक्षर पटेल.
हेसुद्धा पाहा : Legends League Cricket 2023 : कतारमध्ये हरभजन सिंगची हाणामारी, सोशल मीडियावर Video व्हायरल
संघात यापूर्वीच रविंद्र जडेजाच्या रुपात डावखुरा फिरकी गोलंदाज असल्यामुळं अक्षर पटेलला संघातून बाहेरचा रस्ता दाखवत रोहित वॉशिंग्टन सुंदरला संधी देऊ शकतो. ऑफ स्पिन गोलंदाजीसोबतच तो फलंदाजीतही प्रभावी कामगिरी करतो, त्यामुळं यावेळी संघात हे तीन मोठे आणि तितकेच महत्त्वाचे बदल होऊ शकतात.
संभाव्य प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, उमरान मलिक, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज