BGT पूर्वी भारत-ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांची मुलाखत घेणारी ही 10 वर्षांची मुलगी कोण? भारताशी आहे खास कनेक्शन
Border Gavaskar Trophy : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये उत्साहाचे वातावरण असून जागोजागी भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचे बॅनर लागले आहेत. यंदा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टीव्हीवर हिंदीमध्ये कॉमेंट्री केली जाईल.
Border Gavaskar Trophy : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात येत्या 22 नोव्हेंबर पासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. पर्थमध्ये हा सामना होणार असून ही सीरिज भारतासाठी WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्याकरता अत्यंत महत्वाची असणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया सुद्धा घरच्या मैदानावरील सीरिज जिंकू इच्छिते, त्यामुळे दोन्हीही संघ सध्या मैदानात सराव करून घाम गाळत आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये उत्साहाचे वातावरण असून जागोजागी भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचे बॅनर लागले आहेत. यंदा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टीव्हीवर हिंदीमध्ये कॉमेंट्री केली जाईल.
10 वर्षांच्या मुलीने घेतली भारत-ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांची मुलाखत :
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी फॅन्स खूपच उत्साहित आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मागील सलग दोन टेस्ट सीरिज जिंकल्या होत्या. दरम्यान सोशल मीडियावर एक १० वर्षांची मुलगी व्हायरल होत असून तिने भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांच्यासह अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या आहेत. सध्या ही मुलगी कोण याविषयी चर्चा सोशल मीडियावर रंगली.
हेही वाचा : जयस्वाल नाही तर विराटनंतर 'हा' असेल भारतीय क्रिकेटचा किंग, सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितलं
मुलाखत घेणारी डेविड वॉर्नरची मुलगी :
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी दिग्गजांची मुलाखत घेणारी ही 10 वर्षांची लहान मुलगी ही ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नरची मुलगी आहे. तिचे नाव इवी माए असून ती ब्रॉडकास्ट मीडियामध्ये तिच्या भविष्यातील करिअरची तयारी करत आहे. वॉर्नर ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली यात त्याने फोटो पोस्ट करत लिहिले की, 'खेळातील काही महान खेळाडू आणि प्रसारकांची मुलाखत घेण्यासाठी इवी पुन्हा परत आला आहे'. वॉर्नरने इवीचे अनेक फोटो शेअर केले असून यात इवी शास्त्री, एलन बॉर्डर, ब्रेट ली, माइकल वॉन आणि कॉमेंटेटर हर्षा भोगले यांच्या सोबत दिसत आहे. इवी चा जन्म हा 11 सप्टेंबर 2014 मध्ये झाला होता. डेविड वॉर्नरने वर्षाच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो २२ नोव्हेंबर रोजी पर्थमध्ये होणाऱ्या टेस्टमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान कॉमेंट्री करताना दिसेल.
डेविड वॉर्नरने अनेकदा त्याच्या मुलाखतीत सांगितलं होत की भारत हे त्याच दुसरं घर आहे. भारतीय चाहते वॉर्नरवर सुद्धा खूप प्रेम करतात तसेच वॉर्नर देखील अनेकदा भारतीय सण उत्सवाच्या निमित्ताने फॅन्सला शुभेच्छा देताना दिसतो. त्यामुळे वॉर्नरच्या मुलींचं सुद्धा भारतासोबत एक खास कनेक्शन आहे. अनेकदा त्या आयपीएलसाठी भारतात आल्यावर पारंपरिक भारतीय पोशाखात दिसतात.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार ), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक :
पहिली टेस्ट: 22 ते 26 नोव्हेंबर
दुसरी टेस्ट: 6 ते 10 डिसेंबर
तिसरी टेस्ट: 14 ते 18 डिसेंबर
चौथी टेस्ट: 26 ते 30 डिसेंबर
पाचवी टेस्ट: 3 ते 7 जानेवारी