India vs Australia Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया  (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) येत्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतूनच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा निकाल लागणार आहे.त्यामुळे भारताला मायदेशात हरविण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात कसून सराव करत आहे. तसेच टीम इंडियाच्या गोलंदाजांचा कसा सामना करायचा यावरही तोडगा काढायचा प्रयत्न चाललाय. असाच तोडगा आता त्यांनी टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर आर. आश्विनवर (ravichandran ashwin) काढला होता. मात्र या तोडग्यावर आता आश्विनने ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. त्याचे हे प्रत्युत्तर वाचूनच ऑस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ गारद होणार आहे. नेमकं त्याने ट्विट काय केलेय ते जाणून घेऊयात. 


अश्विनचा ड्युप्लिकेट नेट्समध्ये 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने अश्विनचा ड्युप्लिकेट नेट्समध्ये बोलावला आहे. हा अश्विनचा डुप्लिकेट महिश पिठिया (Mahesh Pithiya) आहे, जो हूबेहूब अश्विनसारखीच बॉलिंग टाकतो. या अश्विनच्या डुप्लिकेट गोलंदाजामुळे त्याच्या बॉलचा नेमका कसा सामना करायचा, हे ऑस्ट्रेलियन बॅटसमनला कळणार आहे. त्यामुळे त्याला नेट्समध्ये घेतलेय. 


कोण आहे महिश पिठिया?


21 वर्षीय फिरकीपटू महिश पिठिया (Mahesh Pithiya) हा गुजरातमधील जुनागढचा रहिवासी आहे. अश्विनसारखी हुबेहुब बॉलिंग करण्याची शैली आणि सोशल मीडियावरील फुटेज पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाने पिथियाला त्यांच्या शिबिरात बोलावले आणि त्याला मालिकेसाठी तयार होण्यासाठी राजी केले होते. पिठिया हा अश्विनला आपला आदर्श मानतो. 


आश्विनचा थेट यॉर्कर


ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाची ही आयडिया एकूण आश्विनलाही हसू आले असेलच, म्हणूनच त्याने फिरकी घेण्याचे ठरवले आणि ट्विट केले आहे. आश्विनने एक फोटो ट्विट केला आहे. या ट्विटद्वारे त्याने त्याच्यासारखाच डुप्लिकेट गोलंदाज घेऊन प्रॅक्टीस करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला डिवचलं आहे. अश्विन हा ऑफ ब्रेक गोलंदाज असला तरी आश्चर्यचकित करण्याची क्षमता त्याच्यात आहे. या फोटोमध्ये त्याने त्याच्या बॉलिंगच्या शैलीची संपुर्ण माहिती दिली आहे. अशाप्रकारे फोटो पोस्ट करून त्याने ऑस्ट्रेलियाला एकप्रकारे चॅलेंज दिल्याचेच कळत आहे. 



दरम्यान आता महिश पिठियाच्या (Mahesh Pithiya) नेट्समधील गोलंदाजीचा ऑस्ट्रेलियाला किती फायदा होतो, हे सामन्या दरम्यानच कळणार आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया आश्विनच्या (ravichandran ashwin) बॉलिंग अटॅकला कसे सामोरे जाते हे पाहावे लागणार आहे.  


कसोटी मालिकेचे वेळापत्रक


9-13 फेब्रुवारी: पहिली कसोटी, नागपूर
17-21फेब्रुवारी: दुसरी कसोटी, दिल्ली
1-5 मार्च: तिसरी कसोटी, धर्मशाला
9-13 मार्च: चौथी कसोटी, अहमदाबाद


टीम इंडियाचा संघ :


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि सूर्यकुमार यादव