IND vs AUS: रोहित शर्मा चेतेश्वर पुजारावर एवढा का संतापला? रागाच्या भरात केले असे काही...Video Viral
Rohit Sharma Viral Video: फक्त 13 बॉल खेळून झालेला पुजाऱ्याने रिस्क घेतली आणि बॉल स्लेस करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा निर्णय चुकला. बोलँडने एक अप्रतिम कॅच घेतला आणि पुजाराचा डाव संपुष्टात आला. त्यावेळी रोहितने जे काही केलं ते कॅमेऱ्यात कैद झालंय.
Rohit Sharma Viral Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यातील नागपूर येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma Century) शानदार शतक झळकावलं. एकीकडे विकेट पडत असताना रोहितने जोरदार कामगिरी सुरू ठेवली आणि भारताचा डाव सावरला. रोहितने 171 चेंडूत शतक पूर्ण केलं. रोहितचं कसोटीमधील 9 वं शतक आहे. एका बाजूला सर्वजण बाद होत असताना कर्णधारपदाला साजेशी खेळी केल्याने त्याचं कौतूक होताना दिसतंय. अशातच आता सामन्यातील एक व्हिडिओ (Viral Video) तुफान व्हायरल होताना दिसतोय.
पहिल्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांमध्ये संपवला होता. त्यानंतर दिवसअखेर 1 बाद 77 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने आत्तापर्यंत 224 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू टॉड मर्फीने (Todd Murphy) भारताला दोन धक्के दिले. त्याने 23 धावा करून सेट होऊ पाहणाऱ्या आर अश्विनला बाद केले. त्यानंतर चेतेश्वर पुजाराला देखली 6 धावांवर बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. पुजारा बाद झाल्यानंतर रोहितला संताप (Rohit Sharma Got Angry) अनावर झाला नाही.
नेमकं काय झालं?
नाईट वॉचमन म्हणून मैदानात आलेला आश्विन (Ashwin) दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर बाद झाला. त्यानंतर कसोटी क्रिकेटचा स्टार चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) मैदानात आला. एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या मर्फीचे चेंडू गटांगळ्या खात असताना मैदानात टिकून राहणं महत्त्वाचं होतं. त्यावेळी फक्त 13 बॉल खेळून झालेला पुजाऱ्याने रिस्क घेतली आणि बॉल स्लेस करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा निर्णय चुकला. बोलँडने एक अप्रतिम कॅच घेतला आणि पुजाराचा डाव संपुष्टात आला.
पाहा Video -
दरम्यान, मोक्याच्या क्षणी विकेट गमावल्याने रोहितला राग आला आणि त्याने बॅट पॅडवर (Rohit hit his leg with bat) जोरात मारली. रोहितच्या हा राग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर रोहित शर्माला ट्रोल देखील केलं जातंय. मात्र, त्याच्या शतकाची देखील चर्चा होताना दिसते. भारताचा कर्णधार म्हणून कसोटी, एकदिवसीय, T20 मध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिला भारतीय ठरला आहे.