IND vs AUS: श्रीलंकेनंतर टीम इंडियाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध सिरीज खेळायची आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीमसोबत (Australia Team) भारताला (Team India) 4 टेस्ट सामने खेळायचे आहेत. 9 फेब्रुवारी रोजी पहिली टेस्ट मॅच खेळवण्यात येणार असून यासाठीच्या पहिल्या 2 टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे टीम इंडियाचा स्टार प्लेअर सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar yadav) आनंदाची बातमी आहे. 


सूर्यकुमार यादवचा टेस्ट (Suryakumar yadav test team) टीममध्ये समावेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने शुक्रवारी रात्री ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या 2 टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यामध्ये रोहित शर्मा टीमचं नेतृत्व करणार असून केएल राहुलला उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. मुख्य म्हणजे याशिवाय सूर्यकुमार यादवचा टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सूर्या टेस्ट कधी खेळणार असा प्रश्न चाहत्यांकडून खेळवला जाणार आहे. 


ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या 2 टेस्टसाठी कशी असेल टीम इंडियाची स्क्वॉड


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्धणार), शुभमन गिल, सी पुजारा, व्ही कोहली, एस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव


टेस्ट टीममध्ये संधी मिळेल अशी आशा- सूर्यकुमार यादव


यापूर्वी झालेल्या एका इंटरव्यूमध्ये सूर्याला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या 4 टेस्ट सामन्यांच्या सिरीजसाठी टीममध्ये त्याला जागा मिळू शकते का, अशा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सूर्यकुमार म्हणाला, "मी रेड बॉलच्या फॉर्मेटमध्ये राष्ट्रीय पातळीवर खेळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर त्यामध्येच आहे. टेस्ट सामन्यामध्ये तुम्हाला पाच दिवसांक अवघड तसंच रोमांचक परिस्थितीचा सामना करावा लागतो. या आव्हानाचा सामना करायचाय, त्यामुळे संधी मिळाल्यास मी तयार आहे." 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या दृष्टीने विचार


ऑस्ट्रेलियाविरुद्धची 4 टेस्ट सामन्यांची सिरीज टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे. या सिरीजच्या माध्यमातून भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचं तिकीट मिळणार आहे. यासाठी रोहितच्या सेनेला सिरीजमध्ये किमान 3 मॅच जिंकणं आवश्यक असणार आहे.