मुंबई : "जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पुन्हा एकदा आपली लय मिळवली आहे. प्रतिस्पर्धी संघांनी आता सावध रहायला हवं. कारण आता बुमराहने चांगली लय मिळवली आहे. बुमराहने पहिला बॉलच वाईड टाकला जो की 140 किमीने फेकला होता. यानंतर पुढील बॉलवर बुमराहने एरॉन फिंचला (Aaron Finch) यॉर्कर बॉलवर बोल्ड केला", अशा शब्दात पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने (Danish Kaneria) जसप्रीत बुमराहचं कौतुक केलं. तसंच प्रतिस्पर्धी संघाना सावध रहाण्याचा इशारा दिला. (ind vs aus t 20 series pakistan former cricketer danish kaneria praised jasprit bumrah)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात फिंचला अफलातून यॉर्कर बॉल टाकत क्लिन बोल्ड केला. हा इतका उत्तम यॉर्कर होता की चक्क फिंचनेच टाळी वाजवून दाद दिली. 


कनेरिया काय म्हणाला?  


"दुखापतीनंतर पुन्हा कमबॅक करणं फार आव्हानात्मक असतं. त्यानंतरही बुमराहने शानदार स्पेल टाकला. बुमराह टी 20 वर्ल्ड कपमध्ये फंलदाजांच्या पायाची बोट तोडण्यास सज्ज झाला आहे", असंही दानिशने नमूद केलं. दानिश युट्यूब चॅनेलवर बोलत होता. 


सीरिज कोण जिंकणार?


टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तर मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा रविवारी  25 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे हा तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.