ICC Rankings : ऑस्ट्रेलियावर मालिका विजय मिळवल्यानंतर टीम इंडियासाठी गुडन्यूज
आयसीसी टी 20 रॅंकिंगमध्ये (Icc T20 Ranking) टीम इंडिया (Indian Cricket Team) मजबूत स्थितीत पोहचलीय.
मुंबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर (India vs Australia T 20 Series) टी 20 मालिकेत 2-1 अशा फरकाने मालिका विजय मिळवला. टीम इंडियाने (Indian Cricket Team) पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर जोरदार कमबॅक केलं. सलग 2 सामने जिंकत ऑस्ट्रेलिया विरुद्ध मायदेशात 9 वर्षांनी द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा कारनामा केला. टीम इंडियाला या मालिका विजयाचा फायदा झालाय. आयसीसी टी 20 रॅंकिंगमध्ये (Icc T20 Ranking) टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहचलीय. विशेष म्हणजे अव्वल स्थानही कायम आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या (England) तुलनेत पॉइंट्समधील अंतरही वाढलंय. (ind vs aus t20 team india top in icc t 20 ranking after beat australia in series)
टीम इंडियाकडे मालिका विजयाआधी 6 पॉइंट्सची आघाडी होती, ती आता 7 इतकी झालीय. ताज्या आकडेवारीनुसार, टीम इंडियाचे 268 पॉइंट्स आहेत. तर इंग्लंडचे 261 इतके आहे. पाकिस्तान विरुद्ध मालिका गमावल्याने इंग्लंडला हा फटका बसलाय.
तिसऱ्या क्रमांकासाठी पाक-आफ्रिकामध्ये चढाओढ
दरम्यान तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रस्सीखेच पहायला मिळत आहे. दोन्ही संघाचे प्रत्येकी एकूण 258 पॉइंट्स आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या उर्वरित 3 पैकी 1 सामना जिंकल्यास इंग्लंड आपलं दुसरं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरेल. तर टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या टी 20 मालिकेत आफ्रिका चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. या टी 20 मालिकेला 28 सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहे.