IND vs AUS T20I: क्रिकेट सामन्याच्या तिकिटांसाठी हैदराबादमध्ये चेंगराचेंगरी, VIDEO आला समोर
मॅचचे तिकीट खरेदी करण्यासाठी इतकी उसळली गर्दी की चेंगराचेंगरीच झाली, VIDEO पाहिलात का तुम्ही?
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिला टी20 सामना ऑस्ट्रेलियाने (Australia) जिंकला आहे. या सामन्यानंतर आता उद्या 23 सप्टेंबरला नागपूरमध्ये दुसरा टी20 सामना पार पडणार आहे. या सामन्याची क्रिकेटफॅन्सना उत्सुकता असताना तिकडे हैदराबादमध्ये मॅचची तिकिट खरेदी दरम्यान चेंगराचेंगरी (stampede) झाल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 25 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे तिसरा T20 सामना खेळवला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium) हा सामना होणार आहे. या सामन्याचे तिकिट खरेदी करण्यासाठी हैदराबादमधील जिमखाना मैदानावर आज क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे मोठी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत चार जण जखमी झाले आहेत.
पोलिसांचा लाठीचार्ज
हैदराबादच्या जिमखाना मैदानावर (Hyderabad Gymkhana ground) तिकीट खरेदीसाठी क्रिकेट फॅन्सने मोठी गर्दी केली होती.तिकीट काढण्यासाठी चाहत्यांची लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी (stampede) झाली. प्रचंड जमाव पांगवण्यासाठी आणि नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या चेंगराचेंगरीचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
दरम्यान मोहालीत खेळवण्यात आलेला पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने (Australia) मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. दुसरा सामन्यात भारत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा दुसरा सामना 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणार आहे.