IND W vs AUS W: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) महिला क्रिकेट टीममध्ये पाच सामन्यांची टी-20 सिरीज खेळवली जाणार आहे. ज्याची सुरुवात 9 नोव्हेंबर पासून होणार आहे. या सिरीजचा पहिला सामना डी. व्हाय पाटील स्पोट्स अकॅडमीवर खेळवला जाणार आहे. दरम्यान यासाठीच बीसीसीआयने (BCCI) या सिरीजसाठी टीमच्या 15 सदस्यांची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या 5 सामन्यांच्या सिरीजमध्ये टीम इंडिया (Team India) चं कर्णधारपद हनमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) हाती आहे. या सिरीजमध्ये महिला टीम इंडियामध्ये मोठे बदल पहायला मिळाले आहेत.


ऑस्ट्रेलियाविरूद्ध Team India च्या स्क्वॉडची घोषणा


भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या आगामी टी-20 सिरीजची सुरुवात 9 डिसेंबर रोजी होणार आहे. ज्याचा पहिला सामना डी. व्हाय पाटील स्पोट्स अकॅडमीवर होणार असून उर्वरित सामने मुंबईमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. सुरुवातीचे 2 सामने डी. व्हाय पाटील स्टेडियममध्ये खेळवले जातील तर बाकीचे तीन सामने ब्रेबोर्न स्टेडियममध्ये खेळवण्यात येतील. 


या सिरीजचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. तर टीमचं उपकर्णधारपद स्मृति मंधानाकडे सोपवण्यात आलं आहे. दुखपतग्रस्त असल्याने या सामन्यांमध्ये पूजा वस्त्राकारला आराम देण्यात आला आहे. तर तिची रिप्लेसमेंट म्हणून अंजलि शर्वाणी हिला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. अंजलीच्या रूपात टीममध्ये एका नव्या आणि युवा चेहऱ्याला स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय देविका वैद्य 4 वर्षानंतर पुन्हा एकदा टीममध्ये सामिल होणार आहे.


फेब्रुवारीमध्ये महिला टी-20 वर्ल्ड कप 2023 ला सुरुवात


पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत महिला टी-20 वर्ल्डकप 2023 चं आयोजन केलं आहे. अशात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टीममध्ये होणारी ही सिरीज फार महत्त्वपूर्ण  मानली जातेय. वर्ल्डकपसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीम ताकदवर मानल्या जातायत. 


ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-20 सिरीजसाठी भारतीय सिरीज


हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमा रोड्रिग्स, दीप्ति शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, रेणुका सिंह ठाकुर, मेघना सिंह, अंजलि शर्वाणी, देविका वैद्य, एस मेघना, ऋचा घोष (विकेटकीपर), हरलीन देओल