IND vs AUS Test: भारतीय क्रिकेट टीमचा मिस्टर 360 डिग्री फलंदाजी म्हणजेच सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चा टेस्टमध्ये डेब्यू करण्याचा रस्ता आता जवळपास निश्चित झाला आहे. सूर्यतुमार ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या नागपूर टेस्टमध्ये डेब्यू करण्याची दाट शक्यता आहे. 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येणार असून त्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मात्र ही वाईट बातमी सूर्यासाठी गूड न्यूजपेक्षा कमी नाहीये. 


श्रेयस अय्यर पूर्णपणे फीट नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND v AUS) यांच्यामध्ये 4 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जाणार असून 9 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये पहिला सामना रंगणार आहे. यामध्ये पाठीच्या दुखण्यामुळे टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर पहिली टेस्ट खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. याच दुखापतीमुळे श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमधून बाहेर पडला होता. 


काही रिपोर्टनुसार, श्रेयस अय्यर बंगळूरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमी (National Cricket Academy) मध्ये रिहॅबच्या प्रक्रियेत आहे. अनेक इंजेक्शन घेतल्यानंतरही त्याच्या पाठीच्या खालील भागातील वेदना थांबायचं नाव घेत नाहीयेत. सध्या त्याला 2 आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशातच त्याच्या जागी सूर्या (Suryakumar Yadav) टेस्टमध्ये डेब्यू करणार असल्याचं बोललं जातंय.


सूर्यकुमार यादव टेस्टमध्ये करणार डेब्यू


भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या 4 सामन्यांच्या सिरीजसाठी पहिल्या 2 टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) च्या नावाचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन केल्यानंतर SKY च्या नावाचा टेस्ट टीमसाठी विचार केला गेला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सूर्याची कामगिरी देखील चांगली आहे.


श्रेयस अय्यर कधी करणार टीममध्ये कमबॅक


नागपूरमध्ये होणाऱ्या टेस्ट सिरीजमध्ये अय्यरचा समावेश होण्याची शक्यता कमी असल्याचं मानलं जातंय. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या (BCCI) एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, अय्यरची दुखापत अजूनही बरी झालेली नाही. त्यामुळे त्याला 2 आठवड्यांच्या आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो मैदानात कधी कमबॅक करणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.