WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) फायनल सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळवण्यात येतोय. टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने (  Rohit Sharma ) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामिगरी केली. दरम्यान आता इंग्लंडमध्ये होणारा हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान हा सामना रद्द होण्यामागे पाऊस नसून वेगळं कारण असल्याचं समोर आलंय. 


सामना रद्द होण्यामागे काय आहे कारण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडच्या ओव्हर मैदानावर सुरु असलेला सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यापूर्वीही जेव्हा इंग्लंडची टीम आयर्लंडविरुद्ध टेस्ट सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळत होती, त्यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंच्या बस थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) सामन्यावर देखील रद्दची टांगती तलवार असल्याचं म्हटलं जातंय. 


रद्द होण्यामागे काय असू शकतं कारण?


सध्या इंग्लंडमध्ये बराच गदारोळ सुरू आहे. या ठिकाणी 'जस्ट स्टॉप ऑइल' नावाच्या ग्रुपने सध्या यूके सरकारच्या नवीन तेल, वायू आणि कोळसा धोरणाचा निषेध केलाय. या विरोधामुळे अनेक सामन्यांवर परिणाम झाला होता. गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा परिणाम प्रीमियर लीग फुटबॉल, स्नूकर चॅम्पियनशिप आणि प्रीमियरशिप रग्बी युनियन यांसारख्या मोठ्या स्पर्धांवर झालेला दिसून आला. 


दरम्यान याच कारणामुळे आता क्रिकेटवरही ( Cricket Match ) याचा परिणाम होणार, अशी शक्यता वर्तवण्यात येते. यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप रद्द केली जाऊ शकते, असं म्हटलं जातंय. या आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, इंग्लंड सरकारच्या पर्यावरण विरोधी धोरणांचा फटका सर्वांनाच सहन करावा लागणार आहे.  


दरम्यान ज्या ठिकाणी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC फायनल) ची फायनल खेळवली जातेय, तिथेच लोकं आंदोलन करतायत. यावेळी आयोजकांना आंदोलक पीच खराब करू शकतात, अशी भीती आहे. त्यामुळे ओव्हलमध्ये दोन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्यात. जर आंदोलकांनी आक्रामक पवित्रा हाती घेऊन खेळपट्टी खराब केली, तर दुसऱ्या खेळपट्टीवर सामना खेळवण्यात येईल.


आयसीसीने ( ICC ) तयार केलेल्या या दुसऱ्या पीचवर देखील काही कारणास्तव खेळ झाला नाही तर सामना रद्द करावा लागू शकतो.