ऋषभ पंतचं दणदणीत शतक, एम एस धोनीच्या `या` विक्रमाशी केली बरोबरी
अपघातानंतर टेस्ट सीरिजमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतने बांगलादेश विरुद्ध दणदणीत शतक ठोकलं आहे.
IND VS BAN 1st test Match 3rd Day : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सीरिज मधला पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जात आहे. चेन्नईतील या टेस्ट सामन्याचा आज तिसरा दिवस असून ऋषभ पंतने (Rishabh Pant) फलंदाजी करून मैदानात कहर केला. अपघातानंतर टेस्ट सीरिजमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतने बांगलादेश विरुद्ध दणदणीत शतक ठोकलं आहे. त्याने 128 बॉलमध्ये 109 धावा केल्या.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. तिसऱ्या दिवशी रिषभ पंत आणि शुभमन गिल यांच्या जोडीने तब्बल 100 हुन अधिक धावांची पार्टनरशिप केल्याने भारताने 501 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने या सामन्यात 128 बॉलमध्ये 109 धावा केल्या. या दरम्यान त्याने 13 चौकार आणि 4 सिक्स ठोकले.
Video :
एम एस धोनीच्या 'या' विक्रमाशी बरोबरी :
ऋषभ पंतने बांगलादेश विरुद्ध दणदणीत शतक ठोकून टीम इंडियाचा माजी विकेटकिपर आणि कर्णधार एम एस धोनीच्या (MS Dhoni ) विक्रमाशी बरोबरी केली आहे. एम एस धोनीने टीम इंडियाचा विकेटकिपर म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 6 शतक लगावली. याच रेकॉर्डची शनिवारी ऋषभ पंतने बरोबरी केली. ऋषभ पंतने टेस्ट क्रिकेट कारकिर्दीत एकूण सहा शतक ठोकली आहेत. यामुळे पंतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.