India Vs Bangladesh 2nd ODI:  दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने 7 विकेट गमावून 271धावा ठोकल्या आहेत.मेहंदी हसनच्या (Mehidy Hasan) शतकी आणि  महमदुल्लाहच्या (Mahmudullah) अर्धशतकी खेळीच्या बळावर बांगलादेशने (Bangladesh) 271 धावा ठोकल्या आहेत. आता टीम इंडियासमोर (Team India) 272 इतक्या धावांचे आव्हान असणार आहे. आता हे आव्हान पुर्ण करून टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधते की बांगलादेश मालिकेत दुसरा विजय मिळवते हे पाहावे लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. मात्र बांगलादेशची (Bangladesh)  सुरूवात चांगली झाली नव्हती. बांगलादेशचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले होते. अनामुल हक 11, लिंटन दास 7, नजमुल शांतो 21, शकिब अल हसन 8, मुशफिकर रहिम 12 असे एका मागो माग एक झटपट विकेट पडले. टीम इंडियाच्या बॉलर्सना हे विकेट घेण्यात यश आले होते.


सामन्यात बांगलादेश बॅकफुटला गेल्याचे चित्र होते. मात्र मैदानात उतरलेल्या महमदुल्लाह आणि मेहंदी हसनने डाव सांभाळत संपुर्ण चित्रच बदलून टाकले. महमदुल्लाहने (Mahmudullah) 77 धावांची आणि मेहंदी हसनने (Mehidy Hasan) 100 धावांची शतकी खेळी केली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट बॅटींगच्या बळावर बांगलादेशने 7 विकेट गमावून 271 धावा ठोकल्या आहेत. 


टीम इंडियाकडून वॉशिग्टन सुंदरने सर्वाधिक 3 विकेट, मोहम्मद सिराद आणि उमरान मलिकने (Umran Malik) प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत. टीम इंडियासमोर 272 धावांचे आव्हान असणार आहे.आता हे आव्हान टीम इंडिया पुर्ण करून मालिकेत बरोबरी साधते का हे पाहावे लागणार आहे.