IND VS BAN 2nd Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यातील दुसरा टेस्ट सामना हा कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात असून पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ 35 व्या ओव्हरलाच थांबवण्यात आला. यावेळी बांगलादेशने 3 विकेट्स गमावून 107 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवशी भारत आणि बांग्लादेश टीम  पुन्हा मैदानात आले परंतु दुसऱ्या दिवशीचा खेळ होण्यापूर्वीच टीम इंडिया पुन्हा हॉटेलवर परतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कानपुर येथे 27 ते 29 सप्टेंबर पर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ग्रीन पार्कवरील भारत- बांगलादेश टेस्ट सामन्यावर पावसाचं सावट असून त्यामुळेच पहिल्या दिवसाचा खेळ सुद्धा रद्द करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी तरी पाऊस थांबून सामना पुन्हा सुरु होईल अशी शक्यता होती परंतु सकाळपासूनच पावसाची तुफान बॅटिंग स्टेडियम परिसरात सुरु आहे. 9  वाजता सामना सुरु होणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. अखेर 11 वाजता सामना रद्द होण्याची घोषणा करण्यापूर्वीच टीम इंडिया पुन्हा बसमधून हॉटेलच्या दिशेने रवाना झाली. सध्या याचे व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर येत आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुद्धा पावसामुळे रद्द होऊ शकतो. 


कशी आहे मैदानाची अवस्था? 


समोर येत असलेल्या रिपोर्ट्सनुसार कानपूर स्टेडियमच्या आसपास परिसरातील पाऊस सध्या थांबला आहे. परंतु अजूनही मैदान पूर्णपणे झाकलेले असून पाऊस परतण्याच्या शक्यतेमुळे त्यावर जड रोलर्सही चालवले जात नाहीत. तसेच सूर्यप्रकाश सुद्धा अत्यंत कमी असल्याने मैदानातील ओलसरपणा कायम आहे. लंच ब्रेक पर्यंत सामन्याच्या रेफ्रींनी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द झाल्याची घोषणा केलेली नाही. 


भारताची प्लेईंग 11 :


यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज


बांगलादेशची प्लेईंग 11 :


शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार ), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद