तब्ब्ल १४ वर्षानंतर ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर आज भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय टीमने भरपूर नेट प्रॅक्टिस केली. याच नेट प्रॅक्टिसदरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादव मस्त मस्तीच्या मूडमध्ये दिसला. जेव्हा फलंदाज प्रॅक्टिस करत होते तेव्हा सूर्यकुमार यादव मागून कॉमेंट्री करताना दिसला. याचा मजेशीर व्हिडीओ 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


वॉशिंग्टनची घेतली मज्जा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉशिंग्टन नेट प्रॅक्टिस करत असताना एका शॉटवर सूर्याने त्याला "गाबा" असे म्हटले. यानंतर वॉशिंग्टनच्या प्रत्येक शॉटवर सूर्या बोलताना दिसत आहे. कधी त्याच्या शॉटच कौतुक तो करतो तर कधी तो "थक रहे हो क्या?" असं बोलताना दिसतो. "अये नजाकत सें" असं बोलून वॉशिंग्टन छेडतानाही दिसत आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या शॉटने सूर्या खूपच प्रभावित दिसत होता. या व्हिडीओवरून सूर्यकुमार यादवचे  ट्यूनिंग संघातील इतर खेळाडूंपेक्षा खूपच चांगले असल्याचे दिसत आहे. सगळ्यांसोबत तो खूप मजा करत असल्याचेही दिसत आहे. 


 



कसा असेल आजचा संघ?


भारतीय संघ:  सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मयंक यादव, अर्शदीप सिंग, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, नितीश रेड्डी , हर्षित राणा. 


बांगलादेश संघ: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, तंजीद हसन, परवेज होसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन आणि महमुदुल्लाह.