Jay Shah On Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बांगलादेशाविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या वनडे IND Vs BAN 3rd ODI सामन्यात खेळणार नाहीये. दुसऱ्या वनडे सामन्यात त्याच्या अंगठ्याला झालेल्या गंभीर (Rohit Sharma Injury) दुखापतीमुळे तो वनडे सिरीजमधून बाहेर झाला आहे. दुखापत झाल्यानंतर त्याला रूग्णालयात नेण्यात आलं. अशातच त्याला झालेल्या दुखापतीमुळे तो टेस्ट सिरीजमध्ये (Ind vs Ban) खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र यावर आता भारतीय क्रिकेट बोर्ड सचिव जय शहा यांनी मोठं अपडेट दिलं आहे.


रोहित शर्माच्या दुखापतीवर जय शहा (Jay Shah) यांचं अपडेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जया शहा यांनी शुक्रवारी सांगितलं की, बांगलादेशाविरूद्धच्या 2 टेस्ट सामन्यांची सिरीजमध्ये दुखापतग्रस्त रोहित शर्मा खेळणार का यावर नंतर निर्णय घेतला जाईल. 


बीसीसीआयकडून एक पत्रक जाहीर करण्यात आलंय. यामध्ये जय शहा म्हणालेत की, बीसीसीआयची मेडिकल टीम रोहित शर्माच्या प्रकृतीवर नजर ठेऊन आहे. ढाकामध्ये स्थानिक रूग्णालयात त्याचं स्कॅन करण्यात आलं होतं. त्यानंतर तज्ज्ञांना दाखवण्यासाठी तो मुंबईला रवाना झाला, शिवाय तो शेवटची वनडे खेळणार नाहीये. 


हे 2 खेळाडू लवकरच NCA जाणार


बीसीसीआयने दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि कुलदीप सेन यांना नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये जाण्यास सांगितलं आहे. यावर शहा यांनी सांगितलंय की, वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने पहिल्या वनडेनंतर कंबरेबाबतची समस्या सांगितली होती. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो सिरीजमध्ये खेळू शकणार नाहीये. वेगवान गोलंदाज दीपक चहरला दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापत झाल्याने तोही सिरीजमधून बाहेर गेलाय. 


या खेळाडूला मिळणार कर्णधारपद


रोहित शर्मा जर टेस्ट सिरीज मधून बाहेर पडलात तर त्याच्या जागी केएल राहुल (KL Rahul)ला कर्णधारपदाची धुरा सांभाळावी लागू शकते. याशिवाय शेवटच्या वनडे सामन्यातही त्याला टीमचं नेतृत्व करायचं आहे. 


रोहित शर्माला दुखापत


भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. रोहित शर्मा यापुढे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भाग घेऊ शकणार नाही आणि कसोटी मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.