`अंग्रेजी बोलके बात को घुमा रहा है`; K L Rahul च्या फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांची फिरकी
Ind Vs Ban Updates : टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाकडून असणाऱ्या सर्वच अपेक्षांची पूर्तता संघातील खेळाडू पूर्ण करणार का? हाच प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करु लागला
Ind Vs Ban Updates : टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाकडून असणाऱ्या सर्वच अपेक्षांची पूर्तता संघातील खेळाडू पूर्ण करणार का? हाच प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करु लागला आणि त्यातच सध्या सुरु असणाऱ्या Ind Vs Ban मालिकेमध्ये यजमानांविरूद्धचे दोन कसोटी सामने जिंकत भारताने 2-0 या फरकानं विजय मिळवला. (India vs Bangladesh) अश्निन आणि श्रेयस अय्यरच्या (shreyas iyer) फलंदाजीनं संघाला हा लक्षभेद करण्यास मदत केली. पण, फ्लॉप शो करणाऱ्या के.एल.राहुलनं (K L Rahul ) मात्र त्याच्या खराब फॉर्ममध्ये सातत्य ठेवलं आणि नेटकऱ्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मग काय, सोशल मीडियाचा आधार घेत त्याच्याविरोधात उपरोधिक प्रतिक्रियांचा भडीमार अनेकांनीच केला. (Ind Vs Ban netizens troll Cricketer K L Rahul shares memes latest Marathi news )
सामन्यानंतर आयोजित केल्या जाणाऱ्या सत्रामध्ये या खेळाडूनं केलेली वक्तव्य आणि सारवासारव पाहण्याजोगी होती, असंच काहीजण म्हणाले. तर, काहींनी विनोदी मीम्स (Memes) शेअर करत के.एल आणि त्याच्यासोबत विराट कोहलीलाही (Virat Kohli) निशाण्यावर घेत त्यांच्यावर ताशेरे ओढले.
कुणी या दोघांवर निशाणा साधण्यासाठी गाजलेल्या वेब सीरिजमधील काही दृश्यांचा आधार घेतला, तर कुणी व्हायरल व्हिडीओंचा. के.एल.राहुल नेमका कुठे चुकला यावरूनही त्याच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला. काहींनी तर एक अतिशय बोलका फोटो शेअर केला. जिथं राहुल, द्रविड (Rahul Dravid) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढे मान झुकवून उभा असल्याचं दिसत आहे. इथं एक प्रशिक्षक म्हणून द्रविड राहुलला रागे भरत असल्याचेच भाव त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहेत. तुम्हाला काय वाटतंय?
हेसुद्धा पाहा : Ind vs Ban : 'मला पश्चाताप होत नाहीये...', कुलदीप यादवला ड्रॉप केल्यावर KL Rahul ने सोडलं मौन!
केएल चुकला, पण त्याच्यामुळं एक खेळाडू तरला...
के.एल.नं सामन्यात साजेशी कामगिरी केली नाही. यावरून तो ट्रोलिंगचा शिकारही झाला. पण, त्याच्या एका निर्णयाचं कौतुकही करणारे कमी नव्हते. हा निर्णय होता जयदेव उनाडकटला संधी देण्याचा. कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय सोपा नसूनही राहुलनं तो घेतला आणि 12 वर्षांपासून पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उनाडकटला त्यानं संधी दिली. ज्यामुळं त्याच्या करिअरमध्ये हा सामना अतीव महत्त्वाचा ठरला.