IND vs BAN : रोहित शर्माचं अर्धशतक हुकलं, पण एकामागोमाग तोडले अनेक रेकॉर्ड
Rohit Sharma Record : विश्वचषक 2023 स्पर्धेत भारताने सगल चौथा विजय मिळवला आहे. बांगलादेशविरुद्धात कॅप्टन रोहित शर्माचं अर्धशतक दोन धावांनी हुकलं मात्र त्याने एकामाोगमाग अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.
Rohit Sharma Record : विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत भारताने सलग चौथा विजय मिळवत बांगलादेशचा पराभव केला आहे. आता भारताचा सामना न्यूझीलंडसोबत रविवारी 22 ऑक्टोबरला होणार आहे. बांगलादेशने भारतासमोर 257 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी हिटमॅन रोहित शर्मासोबत स्टार खेळाडू शुभमन गिल मैदानात उतरले. चौके आणि षटकार ठोकत भारतीय संघाने जबरदस्त खेळी केली. रोहित शर्माचं दोन धावाने शतक हुकलं खर पण त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड नोंदवल्या गेले आहेत. (ind vs ban Rohit Sharma missed his half century but broke many records captain in calendar year and odi world cup history)
कर्णधार म्हणून कॅलेंडर वर्षात रोहितचे सर्वाधिक षटकार!
रोहितने बांगलादेशविरुद्धत पहिला षटकार मारताच कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारांच्या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला. हा रेकॉर्ड करताना त्याने इऑन मॉर्गनचा विक्रम मोडला आहे.
सर्वाधिक षटकार ठोकणारे कर्णधार
रोहित शर्मा - 62 षटकार (2023)
इऑन मॉर्गन - 60 षटकार (2019)
एबी डिव्हिलियर्स - 59 षटकार (2015)
ब्रेंडन मॅक्युलम - 54 षटकार (2014)
ख्रिस गेल - 53 षटकार (2009)
आशियामध्ये सर्वाधिक धावा
आशियामध्ये रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या त्याच्या डावात 6000 एकदिवसीय धावा पूर्ण केल्या आहेत. हे करणारा तो सातवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एमएस धोनी, सौरव गांगुली, अझरुद्दीन, राहुल द्रविड या खेळाडूंनी हा विक्रम केला आहे.
आशिया खंडात भारतासाठी सर्वाधिक एकदिससीय धावा
सचिन तेंडुलकर - 12067
विराट कोहली - 7784
एमएस धोनी - 6929
सौरभ गांगुली -6302
एम अझरुद्दीन -6267
राहुल द्रविड -6127
रोहित शर्मा -6000
हेसुद्धा वाचा - विराट कोहलीच्या षटकाराने टीम इंडियाच्या विजयाचा चौकार, बांगलादेशवर 7 विकेटने मात
शकिब अल हसनचा विक्रम मोडला
एकदिवसीय विश्वचषकात धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने शकिब अल हसनचा विक्रम मोडला आहे. रोहितने 750 धावा करत पहिला क्रमांकावर स्थान मिळवलं आहे.
एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
रोहित शर्मा - 750
शाकिब अल हसन - 743
अर्जुन रणतुंगा - 727
स्टीफन फ्लेमिंग - 692
ब्रायन लारा - 681