IND vs BAN : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी आता सर्वच संघात चुरशीची लढत पहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामना रोमांचक स्थितीत पोहोचलाय. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) ताबडतोब 64 धावा कुटल्या आणि संघाला 184 च्या धावसंख्येवर पोहोचवलं. विराटला टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने अखेरच्या षटकात फटकेबाजी केली. त्यावेळी मैदानावर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि विराट कोहली खेळत होते. सामन्याची 17 वी सुरू होती. त्यावेळी भारताच्या 150 धावा झाल्या होत्या. तर 4 गडी तंबुत परतले होते. त्यावेळी 17 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर विराटने जोरदार कवर ड्राईव्ह (Cover drive) मारला. मात्र, त्यावेळी मिड ऑफ आणि इक्स्ट्रा कवरवर फिल्डर उभा होता.


आणखी वाचा - IND vs BAN Video : नो बॉलवरून भर सामन्यात राडा, Virat-Shakib भिडले... पाहा नेमकं काय झालं?


कोहलीने (Virat Kohli) मारलेल्या फटका फिल्डरने आडवला आणि त्याने चेंडू नॉन स्टाईकच्या दिशेने थ्रो केला. त्यावेळी रन पळण्यासाठी पुढे गेलेला डीके धावबाद झाला. डीकेने रनसाठी विराटला कॉल दिला होता. मात्र, विराटने नाही असं सांगितलं. त्यामुळे पुढे आलेला डीके बाद झाला. डीके बाद झाल्यानंतर दोघांमध्ये थोडी शाब्दिक बाचाबाची देखील झाल्याचं पहायला मिळालंय.


पाहा व्हिडीओ- 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


दरम्यान, विराट स्टाईकला असल्याने कॉल विराटचा बरोबर होता, असं अनेकांचं म्हणण आहे. त्यामुळे या रन आऊटची एकच चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा... नेमकी चूक कोणाची? विराटची की डीकेची?