IND vs BAN Video : नो बॉलवरून भर सामन्यात राडा, Virat-Shakib भिडले... पाहा नेमकं काय झालं?

No ball controversy :16 व्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळला जात होता. त्यावेळी एक पुल लेथ बॉल टाकण्यात आला. त्यावर विराटने फटका मारला. त्यावेळी...

Updated: Nov 2, 2022, 04:18 PM IST
IND vs BAN Video : नो बॉलवरून भर सामन्यात राडा, Virat-Shakib भिडले... पाहा नेमकं काय झालं? title=
Virat Kohli Shakib Al Hasan No ball controversy

Virat Kohli, Shakib Al Hasan: सध्या सुरू असलेल्या T20 World Cup चा 35 वा सामना भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळला जात आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून सेमीफायनलचं (Semi Final) तिकीट कन्फर्म करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे बांग्लादेश रेसमध्ये कायम राहण्यासाठी धडपड करत आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने आक्रमक फटकेबाजी केली. त्यावेळी विराट कोहलीने (Virat Kohli) ताबडतोब 64 धावा कुटल्या आणि संघाला 184 च्या धावसंख्येवर पोहोचवलं.

कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकर आऊट झाल्यानंतर के एल राहूलने (KL Rahul) पुन्हा क्लास दाखवत शानदार अर्धशतक ठोकलं. त्यावेळी विराटने देखील आपली रनमशिन सुरू केली आणि बांग्लादेशच्या गोलंदाजांना फोडून काढलं. त्यावेळी कॅप्टनने स्वत: जबाबदारी घेत राहूलला तंबुत पाठवलं. त्यानंतर त्याने सुर्याला (Suryakumar) देखील बाद केलं. मात्र, विराट क्रिझवर असताना विराट शाकिब भिडल्याचं पहायला मिळालं आहे.

आणखी वाचा - Ind VS Ban : शाकिबच्या वक्तव्यावर राहुल द्रविडला हसू अनावर; दिलेल्या उत्तराने जिंकले मन

नेमकं काय झालं?

16 व्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळला जात होता. त्यावेळी एक पुल लेथ बॉल टाकण्यात आला. त्यावर विराटने फटका मारला. त्यावेळी विराटने पळता पळता नो बॉल देण्याची मागणी केली. त्यावर शाकिबने आक्षेप घेतला आणि थेट अंपायर्सशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी विराटने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांनी हसत हसत वाद (No ball controversy) घातला.

पाहा व्हिडीओ - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, दोन्ही सिनियर खेळाडूंनी खेळभावना जोपासल्याने दोघांचं कौतूक होताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. भारत बांग्लादेश सामन्यात पावसाने व्यथ्यय आणल्याने सामना कोणत्या दिशेने जाईल? यावर सध्या चर्चा सुरू आहे.