IND vs BAN Test: `रोहितला घरात बसायला सांग...`, माजी दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान
Ind vs Ban : दुसऱ्या टेस्टसाठी रोहित शर्मा (rohit sharma team) टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे या खेळाडूची बॅटिंग पोजिशन बदलू शकते. याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने (Ajay Jadeja) यांनी रोहित शर्मा बाबत मोठे विधान केले आहे.
India vs Bangladesh Test Series 2022 : टीम इंडिया (team india) आणि बांग्लादेशमध्ये (Ind vs Ban) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा एक खेळाडू पूर्णपणे फ्लॉप आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma Injury Update) अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे सामन्यातून बाहेर पडावे लागले. मात्र आता दुसऱ्या टेस्टसाठी रोहित शर्मा (rohit sharma team) टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे या खेळाडूची बॅटिंग पोजिशन बदलू शकते. याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने (Ajay Jadeja) यांनी रोहित शर्मा बाबत मोठे विधान केले आहे.
रोहित शर्मा (rohit sharma) परतल्यावर कोण बाहेर बसणार असे विचारण्यात आले, त्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने (Ajay Jadeja) मोठे विधान केले आहे. यावर जडेजा म्हणाला की, 'मी रोहितला घरात बसायला सांगत आहे. जेव्हा एखाद्या खेळाडूच्या हाताला फ्रॅक्चर होते आणि तुम्ही सुमारे 10 दिवस बॅट धरू शकत नाही, तरीही तुम्ही बरे झालात तरीही तुम्ही दुसऱ्या दिवशी संघात सामील होऊ शकत नाही. अशी प्रतिक्रीया जडेजाने रोहित शर्माबाबत (rohit sharma team) दिली आहे.
तसेच रोहितला बरे होण्यासाठी आणखी 1 ते 15 दिवस लागतील. आणि दुखापत किती आहे हे अद्याप आम्हाला माहित नाही. म्हणूनच मी हे सुचवतो. आपण तात्पुरता उपाय शोधत आहोत आणि त्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून सुरू होणार असून हा या दौऱ्यातील शेवटचा सामना असेल.
वाचा : वन डे मालिका गमावलेल्या भारतीय संघाचा कसोटी मालिकेत श्रीगणेशाने विजयाची सुरूवात
दरम्यान टीम इंडियाने (team india) आज (19 डिसेंबर) बांगलादेशचा (ind vs ban) 188 धावांनी पराभव केला आहे. पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराच्या 90 आणि श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) 86 धावांच्या जोरावर टीम इंडियाने (team india) पहिल्या डावात 404 धावा केल्या. बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. टीम इंडियासाठी कुलदीप यादवने पहिल्या डावात सर्वाधिक 5 तर मोहम्मद सिराजने 3 बळी घेतले. 500 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 324 धावांत गारद झाला. कुलदीप यादवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.