IND vs BAN Viral Video :  भारत आणि बांगलादेशमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला आहे. भारत सामना जिंकेल असं वाटत होतं बांगलादेशच्या मेहदी हसन 38 धावा (Mehidy Hasan) आणि मुस्तफिजुर रहमान 10 धावा यांनी विक्रमी अर्धशतकी भागीदारी करत विजय हिसकावून घेतला. सामन्यामध्ये भारताला दोनवेळा संधी मिळाली होती मात्र खराब फिल्डिंगमुळे ती गमवली. के. एल. राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी या संधी गमावल्या. हातातला सामना गेल्यामुळे रोहित शर्माचा पारा चढला होता. जेव्हा हे कॅच सुटले गेले त्यावेळी रोहितने शिवी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत कमी धावसंख्या असातानाही बांगलादेशच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. बांगलादेशच्या 136 धावांवर 9 विकेट्स पडल्या होत्या, त्यामुळे भारत हा सामना जिंकेल असं वाटत होतं मात्र मेहदी हसन आणि मुस्तफिजुर रहमान यांनी विजयाच्या स्वप्नांना धुळीस मिळवलं. 



या दरम्यान शार्दुलच्या गोलंदाजीवर मेहदी हसनच्या बॅटला कट लागून चेंडू हवेत उडाला होता यामागे के. एल. राहुल उलटा धावत गेला मात्र तो कॅच पकडण्यात यशस्वी ठरला नाही. त्यानंतर आणखी एक चेंडू मागे गेला त्यावेळी वॉशिंग्टन सुंदरपासून तो लांब पडला. त्याने कॅच पकडण्याचा प्रयत्नही केला नाही. दोन लगोलग कॅच पकडण्याची संधी गेल्याने रोहितचा पारा चढला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रोहित शिवी देत असल्याचं दिसत आहे. 


दरम्यान, भारत आणि बांगलादेश (india vs Bangladesh) यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकत बांगलादेशने 1-0 ने आघाडी मिळवली आहे.