Eng vs Ind | वन डे सीरिजसाठी रोहित शर्मा या खेळाडूला करतोय मिस?
विराट कोहली नाही तर या खेळाडूला रोहित का करतोय मिस? जाणून घ्या कारण
मुंबई : इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया आज पहिला वन डे सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याआधी विराट कोहली दुखापतीमुळे टीमबाहेर झाला आहे. यावेळी मात्र कर्णधार रोहित शर्मा विराटपेक्षा स्टार खेळाडूला जास्त मिस करत आहे.
कर्णधार रोहित शर्माला वन डे सीरिजमध्ये स्टार खेळाडूची उणीव भासत आहे. या खेळाडूने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली. लखनऊचं नेतृत्व करत टॉप तीनपर्यंत पोहोचवलं. आपल्या तुफान बॅटिंगने सामना पलटवणाऱ्या खेळाडूला रोहित मिस करत आहे.
रोहित शर्माला के एल राहुलची उणीव भासत आहे. रोहित आणि के एल राहुलची जोडी हिट ठरली होती. मात्र दुखापतीमुळे आता तो इंग्लंड दौऱ्यातून बाहेर झाला होता. त्याच्या पायावर यशस्वी सर्जरी देखील झाली. ती त्याने जर्मनीमधून केली. के एल राहुल पूर्ण फिट होऊन मैदानात कधी परतणार याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
टीम इंडियात या पहिल्या सामन्यातून स्टार ऑलराऊंडर खेळाडूचं जवळपास एका वर्षानंतर पुनरागमन झालं आहे. हार्दिक पंड्याचं कमबॅक झालंय. त्यामुळे टीम इंडियाला हार्दिककडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.