मुंबई: भारतविरुद्ध इंग्लंड चैन्नईमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीत चेपॉकच्या मैदानावर 227 धावांनी केलेल्या पराभवानंतर भारतीय संघावर खूप दबाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघ वेगानं स्कोअरबोर्डवर पुढे सरकत असताना रोहित शर्मा वगळता बाकी बॅटिंग लाइनअपमधील खेळाडूंनी विशेष कामगिरी सध्यातरी केलेली दिसली नाही. शुभम गिल तर आपलं धावांचं खातं मैदानावर न उघडताच माघारी परतला आहे. 


टीम इंडियाला मजबूती मिळत असतानाच एक मोठा झटका मिळाला आहे.  चेतेश्वर पुजारा 58 चेंडूंमध्ये केवळ 21 धावा काढून माघारी परतले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली शू्न्य धावांवर आऊट झाला. 




पुजाराची विकेट बाद झाल्यानंतर विराट कोहली (विराट कोही) क्रीजवर आला. चाहत्याच्या विराटकडून खूप अपेक्षा होत्या पण त्या अपेक्षा एक चेंडूनं भंग केल्या. इंग्लंडचा गोलंदाज मोईन अलीनं असा खतरनाक चेंडू टाकला की एकही धावा न काढता विराट कोहली थेट तंबूत माघारी परला. विराट कोहलीला शून्य धावांवर आऊट करण्यात मोईन अली यशस्वी ठरला आणि चाहत्यांची मोठी निराशा झाली. मोईन अलीनं टाकलेल्या चेंडूनं विराट कोहलीची तर दांडीच गुल झाली. त्यानं टाकलेला बॉल टोलवत विराट एक क्षण काय घडलं याकडे पाहात राहिला. मैदानावर येताच एकही धावा न काढता विराटला माघारी परतावं लागलं. त्यामुळे मोठी निराशा झाली.


मोईन अलीचा चेंडू खूपच खतरनाक होता की एकाच वेळी मैदानात येताच दांडी गूल झाली. चेंडू ऑफ स्टंपपासून दूर पडला आणि सरळ आत गेला. बॉलने स्टम्पच्या वरच्या बाजूस धडक दिली आणि स्टंपच्या वर असलेल्या बेल्स खाली पडल्या. विराट कोहली दोन मिनिटं मैदानात तसाच उभा राहिला त्यानं रोहितला नेमकं काय झालं असं विचारलं. आपण आऊट झालो त्यावर विराटचा दोन मिनिटं विश्वासच बसत नव्हता.