चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला डाव संपला आहे. या डावात भारताला मोठं यश मिळालं. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंड संघ नरमला. अवघ्या 134 धावा काढण्यात त्यांना यश आलं. पहिल्या कसोटी सामन्याच्या तुलने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंड संघाला मोठं अपयश आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडला 134 धावा देऊन बाद केल्यानंतर टीम इंडियाने दुसर्‍या दिवशी आपला दुसरा डाव सुरू केला आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल क्रीझवर आहेत.


टीम इंडियाने दमदार कामगिरी करत इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांवर अडवून ठेवला. तर अश्विननं आपल्या शानदार गोलंदाजीनं 5 बळी आपल्या नावावर केले आहेत.



भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीतील दुसरा डाव सुरू झाला आहे. त्यामुळे या डावावर सर्वांचं लक्ष असणार आहे. रोहित शर्मानं पहिल्या डावात 161 धावा केल्या होत्या. तर शुबमन गिल शून्य धावांवर बाद झाला होता. त्यामुळे आता शुभमला त्याचं खातं नव्यानं उघडण्याचं संधी असणार आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या मालिकेत यजमान इंग्लंडनं दमदार कामगिरी केली होती. 227 धावांनी भारताचा पराभव केला होता. त्याचा बदला भारतीय संघ या डावात घेऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या डावाकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला आहे. सध्या दुसरा डाव सुरू आहे.