चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. चेन्नईतील चेपॉक मैदानात दुसऱ्या सामन्य़ाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड असल्याचं आताच्या स्कोअरवरून तरी दिसून येत आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने 329 धावा केल्या आणि त्यांचे सर्व गडी बाद झाले. त्यानंतर इंग्लंडची फलंदाजी सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

48 ओव्हरमध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांची यशस्वी कामगिरी केली आहे. इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत पाठवण्यात यश आलं आहे. इंग्लंडने 48 ओव्हरमध्ये आपला सातवा गडी गमावला. मोईन अली अवघ्या 6 धावा काढून माघारी परतला.


भारतीय संघाची स्थिती सध्या बऱ्यापैकी मजबूत झाली आहे. इंग्लंड संघाच्या 8 विकेट पडल्या आहेत. सिराजने ओली पोपला 22 धावांवर तंबूत पाठवले.



डॅन लॉरेन्स 52 चेंडूंत 9 धावा काढून बाद झाला. तर रूट अवघ्या 6 धावांवर बाद झाल्यानं संघाचं मनोबल खचल्याची चर्चा आहे. अश्विनने डोम सिब्लीला 16 धावांवर तंबूत पाठवलं आहे.



भारतानं शनिवारी आणि रविवारी दोन दिवस भारतानं चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्मा आणि अजिंक रहाणेनं उत्तम खेळी केली. रोहित शर्मानं 161 धावांची मिळवून दिल्या तर रहाणेनं शतक पूर्ण केलं. सध्याच्या स्थितीला टीम इंडियाची स्थिती खूप मजबूत दिसत आहे. इंग्लंडचा 8वा खेळाडू देखील तंबूत परतला आहे. अश्विनने ऑली स्टोनला बाद करून चौथी विकेट आपल्या नावावर करून घेतली आहे.