चेन्नई : चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाची दुसरी इनिंगमध्ये पडझड झालीय.. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या बॅट्समनना झटपट माघारी धाडण्यात इंग्लंडला यश आलंय. पहिल्या इनिंगमध्ये 161 रन्सची खेळी करणारा रोहित शर्मा दुसऱ्या इनिंगमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत आणि अक्सर पटेल लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले.. त्यानंतर कॅप्टन विराट कोहली आणि आर. अश्विननं टीम इंडियाची इनिंग सावरली.. दोघांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.. सध्या टीम इंडियाकडे 351 रन्सची लीड आहे.


टीम इंडियाने दमदार कामगिरी करत इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांवर अडवून ठेवला. तर अश्विननं आपल्या शानदार गोलंदाजीनं 5 बळी आपल्या नावावर केले आहेत.



रोहित शर्मानं पहिल्या डावात 161 धावा केल्या होत्या. तर शुबमन गिल शून्य धावांवर बाद झाला होता. त्यामुळे आता शुभमला त्याचं खातं नव्यानं उघडण्याचं संधी असणार आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या मालिकेत यजमान इंग्लंडनं दमदार कामगिरी केली होती. 227 धावांनी भारताचा पराभव केला होता. त्याचा बदला भारतीय संघ या डावात घेऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या डावाकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला आहे.