नॉटिंघम: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पावसामुळे पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला असून आता उर्वरित 4 सामन्यांवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. टीम इंडियासाठी ही मालिका जिंकणं महत्त्वाचं आहे. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली होती. इंग्लंडच्या खेळाडूंना धावांचा डोंगर उभारण्यापासून रोखलं होतं. मात्र पावसानं घोळ केला आणि सामना ड्रॉ झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याआधी एक मोठी अपडेट मिऴत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याआधी चेतेश्वर पुजाराला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून डिच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात त्याची विशेष कामगिरी दिसली नाही. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 


दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी चेतेश्वर पुजारा ऐवजी हनुमा विहारीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तिसऱ्या स्थानावर पुजारा ऐवजी हनुमा विहारी खेळण्यासाठी मैदानात उतरेल असं सांगितलं जात आहे. 27 वर्षाच्या हनुमाने 12 कसोटी सामन्यात 624 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची हीच कामगिरी टीम इंडियासाठी फायद्याची ठरू शकते.


चेतेश्वर पुजाराचं कसोटीमधील भवितव्य धोक्यात जाण्याची शक्यता वाढत आहे. 2019 पासून पुजाराला जास्त धावा काढण्यात किंवा फलंदाजीत विशेष यश मिळवण्यात अडचणी येत आहेत. 2019 मध्ये पुजाराने 18 सामने खेळून 504 धावा केल्या आहेत. त्याचा खराब फॉर्म त्याच्या करियरसाठी धोक्याचा ठरू शकतं असं अनेक तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं.


या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत दुखापत झाल्यानंतरही हनुमा विहारीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आपल्या फलंदाजीनं उत्तर दिलं. सिडनी कसोटीत कांगारू संघ सामना जिंकण्याच्या मार्गावर होता, पण हनुमा विहारीने आपल्या तुफानी फलंदाजीनं सामना ड्रॉ केला.