IND vs ENG ranchi Test : भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जातोय. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाने 307 धावा करत कडवी झुंज दिली. मात्र, टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी सामना फिरवला. रविचंद्रन आश्विन (Ravichandran Ashwin) आणि कुलदीप यादवच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या डावात गुडघ्यावर टेकवलं. आर आश्विने टेस्ट करियरमधील 35 वेळा पंचा उघडला (R Ashwin 35th fifer in Tests) आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्विन इंग्लंडच्या पाच प्रमुख फलंदाजांना बाद करत इतिहास रचला आहे. रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात हा इतिहास रचला आहे. अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बेन डकेट आणि ऑली पोप यांना दोन चेंडूत बाद करताच त्याने भारतात कसोटी खेळताना 350 बळी पूर्ण केले. त्यामुळे आर अश्विन हा भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. आजपर्यंत भारताच्या कोणत्याही खेळाडूने त्यांच्यापेक्षा जास्त कसोटी बळी घेतलेले नाहीत.



आश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादवने चार विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. त्याचबरोबर जडेजाच्या खात्यात एक विकेट आली.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.


इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.