IND vs ENG | सामन्याआधी बुमराह टीममधून आऊट! कारण आलं समोर
तिसऱ्या वन डेआधी जसप्रीत बुमराह बाहेर का गेला? कॅप्टन रोहितनं सांगितलं कारण
मुंबई : इंग्लंड विरुद्ध तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. हा शेवटचा आणि निर्णयाक सामना आहे. 3 वन डे सामन्याच्या सीरिजमध्ये दोन्ही टीम 1-1 ने बरोबरी केली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे तरंच सीरिज जिंकू शकणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला.
तिसरा सामना सुरू होण्याआधी बुमराह टीममधून बाहेर झाला. बुमराह प्लेइंग इलेव्हेनचा भाग होता. मात्र अचानक बाहेर गेल्याने नेमकं काय झालं अशी चर्चा सुरू झाली. त्यावर रोहित शर्माने उत्तर दिलं आहे.
इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या वन डे सामन्यात बुमराहला दुखापत झाली. तो दुखापतीमधून अजून पूर्ण बरा झाला नाही. त्यामुळे त्याला आराम देण्यात आला आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराज खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्माने याबाबत खुलासा केला.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी भारताने नाणेफेक जिंकली आहे. कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे इंग्लंडची पहिली बॅटिंग असणार आहे. 3 सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा सामना जिंकून कोणती टीम सीरिज खिशात घालणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.