IND vs ENG 3rd Test : आजवर भारतीय क्रिकेट संघात अनेक नवख्या खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली. भारतीय संघासाठी क्रिकेट खेळणं हा या सर्वच खेळाडूंसाठीचा आतापर्यंतचा महत्त्वाचा क्षण ठरला. अशाच खेळाडूंच्या यादीमध्ये आता आणखी एक नाव नव्यानं समाविष्ट झालं आहे. हे नाव आहे 26 वर्षीय खेळाडू सरफराज खानचं. अनेक वर्षांची मेहनत आणि क्रिकेटप्रती असणारी ओढ, जिद्द, चिकाटी यांच्या बळावर सरफराजनं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवाकी राजकोट येथे भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमधील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या निमित्तानं सरफराजला संघात स्थान देण्यात आलं. मुंबईच्या सरफराजचं संघात स्वागत करत असताना संघातील माजी खेळाडू अनिल कुंबळे यांनी त्याला team cap देऊ केली. यावेळी जेव्हा सरफराजचं संघाच्या वतीनं स्वागत केलं जात होतं तेव्हाच त्याचे वडील नौशाद खानसुद्धा मैदानावर उपस्थित होते. 


अतिशय अभिमानाच्या अशा या क्षणी त्यांना भावनांना आवर घालता आला नाही आणि त्यांनी सरफराजला घट्ट मिठी मारली. यावेळी लेकाला मिळालेली team cap त्यांनी डोळे भरुन पाहत तिचं चुंबन घेतलं. नौशाद यांनी सरफराजच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मोलाचं योगदान दिलं असून, तेच त्याचे प्रशिक्षकही आहेत. यावेळी नौशाद यांच्या जर्सीनं सर्वांचं लक्ष वेधलं. Cricket is gentelmen`s Everyone`s game असे शब्द तिथं लिहिण्यात आले होते. 


हेसुद्धा पाहा : Video : 30 सेकंदांत BCCI चा निर्णय; T20 वर्ल्ड कपआधी जय शाह जे म्हणाले ते ऐकताच रोहित शर्माचा चेहरा पाहण्याजोगा 


प्रचंड जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर लेकाला अखेर त्याचं स्वप्न साकार करताना पाहून ज्याप्रमाणं कोणत्याही वडिलांच्या भावना दाटून येतील अगदी तसंच काहीसं नौशाद खान यांच्यासोबत झालं. त्यांना पाहून नकळतच सरफराजही भावूक झाला. आनंद, अश्रू, कुतूहल आणि उत्साह अशा अनेक भावना यावेळी सरफराज आणि त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाल्या. 




'या' खेळाडूमुळं मिळाली सरफराजला संधी 


केएल राहुलच्या अनपेक्षित दुखापतीमुळं सरफराज खानला भारतीय कसोटी संघात स्थान मिळालं. त्याच्यासोबतच युवा खेळाडू, विकेट किपर अर्थात यष्ठीरक्षक आणि फलंदाज ध्रुव जुरेल यालाही संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. केएस भरतच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आलं.