अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. सध्या जेवणाच्या ब्रेकपर्यंत पहिल्या डावावर इंग्लंड संघाची पकड मजबूत असल्याचं दिसत आहे. भारतीय संघासमोर तगडं आव्हान असून बाजी पलटवण्यात यश मिळेल का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने दुपारच्या जेवणापर्यंत 4 गडी गमावले आहेत. भारताने आतापर्यंत 37.5 षटकांत 80 धावा केल्या आहेत. तर भारतासमोर आणखीन 125 धावांचं आव्हान आहे. रोहित शर्मा 32 धावा करून क्रिझवर सध्या खेळत आहे. 


कर्णधार विराट कोहली तर शून्यावर आऊट झाला. मैदानात आल्यानंतर 8 चेंडू खेळूनही त्याला एकही रन काढता आला नाही. तर बेन स्टोक्सचा चेंडूवर तो बाद झाला.


पहिल्या डावात 35 षटकांच्या अखेरीस भारताने 3 गडी गमावल्यानंतर 70 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा 31 तर अजिंक्य रहाणे 18 धावा केल्या होत्या. 



आतापर्यंत भारतीय संघातील 4 गडी बाद झाले असून 80 धावा करण्यात भारतीय संघाला यश आलं आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. ऋषभ पंत, रोहित शर्मावर मोठी कमान आहे. त्यामुळे हे दोन खेळाडू बाजी पलटवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


अरेरे! लाजीरवाण्या रेकॉर्डमध्ये विराट कोहली अव्वल


भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकला तर भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचेल. मात्र भारतीय संघासमोर इंग्लंडनं तगडं आव्हान उभं केलं आहे. आता भारतीय संघाचे खेळाडू हे आव्हान कसं पेलणार आणि बाजी पलटवण्यात यशस्वी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.