अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरच्या कसोटीत इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉलीला मोहम्मद सिराज (मोहम्मद सिराज) च्या मिड ऑफवर झेल देऊन भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने सामन्यात दुसरी विकेट घेतली. अक्षरने ही विकेट घेतली असली तरी त्याचं श्रेय मात्र ऋषभ पंतला जातं अशी चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रॉली आऊट होण्याआधी पंतने मागून त्य़ाला चिडवायला सुरुवात केली. 'कुणाला राग येतोय, कुणाला राग येतो आहे'. असं चिडवल्यानंतर क्रॉलीने आपली आलेल्या चेंडू तुफान टोलवला खरा पण क्रॉली बाद झाला. 


क्रॉली आऊट होताच एका चाहत्याने पंतच्या स्लेजिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे.




विराट कोहली आणि बेन स्टोक्स यांच्यात मैदानावर शाब्दिक वाद : VIDEO



ऋषभ पंत विकेटच्या मागच्या बाजूला उभं राहून अशा प्रकारचे किडे करण्यात खूपच प्रसिद्ध आहे. यापूर्वी त्यानं आपल्या हसण्यामुळे एका खेळाडूला संभ्रमित केलं होतं आणि त्यामुळे त्याच्या धावा होता होता अर्धवट राहिल्या.


या आधी देखील ऋषभनं भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात आपल्या विचित्र हसण्यातून खेळाडूला बचकवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील ठरला. आज पुन्हा एकदा ऋषभनं फलंदाजाला मागून डिवचल्यानं तो आऊट झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पहिल्या सामन्यात सध्यातरी भारताची पकड मजबूत असल्याचं दिसत आहे.