IND VS ENG : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळालं. पंचांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. पहिल्या सत्रात भारतीय संघाने पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली आणि फिरकीपटू अक्षर पटेलने इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर डोमिनिक सिब्ले आणि जॅक क्राउली यांना स्वस्तात माघारी पाठवलं. इंग्लंडचा कर्णधार जो रूटला बाद करून सिराजने टीम इंडियाला मोठा दिलासा दिला.
खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बेन स्टोक्स आणि मोहम्मद सिराज यांच्यात बऱ्याचदा शाब्दिक वाद रंगला, त्यानंतर विराट कोहली देखील यामध्ये पडला. बेन स्टोक्स आणि विराट कोहली यांच्यात शाब्दिक वाद झाला. विराट कोहली आणि बेन स्टोक्समध्ये वाद सुरू असताना विराट कोहली कूल दिसत असला तरी बेन स्टोक्स पूर्णपणे गंभीर होता. शाब्दिक वाद वाढत असताना पंचांना मध्यस्थी करावी लागली.
Best vs Best!!#India#stokes #Kohli #INDvsENG #AhmedabadTest #siraj #sledge pic.twitter.com/fDefXT5bwz
— Parikshit manglunia (@pa10231) March 4, 2021
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी बातमी लिहिपर्यंत इंग्लंडने 5 गडी गमावून 144 धावा केल्या आहेत.