अजिंक्यचं करियर धोक्यात, हा मुंबईकर खेळाडू जागा घेणार? काय म्हणाजे दिग्गज
टीम इंडियातील या फलंदाजाची जागा धोक्यात, दिग्गज क्रिकेटरचा इशारा
मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज 4 ऑगस्टपासून खेळवण्यात येणार आहे. या सीरिजआधी मुंबईच्या खेळाडूकडून अजिंक्य रहाणेला आव्हान मिळण्याची शक्यता आहे. आधीच टीम इंडियाचे आधीच तीन खेळाडू सीरिजमधून बाहेर झालेले असताना आता रहाणेची जागा धोक्यात असल्याचं धक्कादायक दावा माजी टीम इंडियातील क्रिकेटपटूनं केला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. पहिला टेस्ट सामना 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जाईल. इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतीय संघात मोठे बदल होऊ शकतात. अनेक क्रिकेटपटूंचे करिअर पणाला लागल्याचीही चर्चा आहे.
अजिंक्य रहाणेच्या कामगिरीवर गेल्या काही महिन्यांपासून प्रश्नचिन्ह केलं जात आहे. या इंग्लंड दौऱ्यावर अजिंक्य रहाणेला स्वतःला सिद्ध करण्यासाठी काहीतरी विशेष कामगिरी करावी लागणार आहे. नाहीतर टेस्ट सीरिजमधील अजिंक्य रहाणेचं करियर धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय क्रिकेट संघाकडे सूर्यकुमार यादवसारखा तुफान फलंदाज तयार होताना दिसत आहे. त्याला एकापेक्षाजास्त शॉट खेळण्याची आणि धावा काढण्याची कला अवगत झाली आहे. जर अजिंक्य रहाणे या मालिकेत चांगली कामगिरी करू शकला नाही, तर सूर्यकुमार यादवला टेस्ट सीरिजसाठी संधी दिली जाऊ शकते.
सुनिल गावस्कर यांच्या मते, पुजारा आणि रहाणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या 6-8 महिन्यांत सलग धावा कोणी केल्या? खरे लक्ष्य रहाणे आहे. म्हणूनच पुजाराच्या नावावर दबाव आणला जात आहे. जेणेकरून रहाणेला लक्ष्य केले जात आहे असे जगाला वाटू नये. पुजाराचा फक्त प्यादा म्हणून वापर होत आहे. निवड समिती आणि टीम इंडियाचं खरं टार्गेट तर रहाणे आहे असंही गावस्कर म्हणाले.
इंग्लंड विरुद्ध सीरिजमध्ये टीम इंडियाची निवड खूप खास असणार आहे. अजिंक्य रहाणेला धोक्याचा इशारा सुनिल गावस्करांनी दिला आहे. सुनिल गावस्कर यांच्या मते जर अजिंक्य रहाणे यावेळी चांगली कामगिरी करू शकला नाही तर त्याची कसोटीतील टीम इंडियातील जागा धोक्यात येऊ शकते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अजिंक्यने 49 धावा केल्या होत्या.
टीम इंडिया अजिंक्य रहाणेला संघातून बाहेर करण्याचा विचार करत असल्याच्याची चर्चा आहे. याशिवाय माजी विकेटकीपर फलंदाज दीपदास गुप्ता देखील अजिंक्य रहाणेच्या कामगिरीवर नाराज आहेत. आतापर्यंत अजिंक्य रहाणेने इंग्लंड विरुद्ध 17 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 5 अर्धशतक आणि 1 शतक केलं आहे.
शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर जखमी असल्याने टीम इंडियाला आधीच मोठा धक्का बसला आहे. दोन चांगले फलंदाज दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. याच दरम्यान जर अजिंक्य रहाणेला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्याचा निर्णय हा टीम इंडियासाठीच धोक्याचा ठरू शकतो. त्यामुळे आता नेमकं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.