मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड 3 टी 20 सामन्यांची सीरिज खेळवली जात आहे. 7 जुलै रोजी पहिला सामना झाला. हा सामना 50 धावांनी टीम इंडियाने जिंकला आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 20 ओव्हरमध्ये 8 गडी गमावून 198 धावा केल्या. इंग्लंडसमोर 199 धावांचं लक्ष्य ठेवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड टीमला लक्ष्याचा पाठलाग करताना 148 धावा करता आल्या. टीम इंडियाच्या विजयात हार्दिक पांड्याचं मोठं योगदान आहे. त्याने टी 20 करिअरमध्ये पहिल्यांदा अर्धशतक झळकवलं आहे. आयपीएलपासून हार्दिक पांड्या पुन्हा फॉर्ममध्ये खेळताना दिसला. तर बॉलिंग करताना त्याने 4 विकेट्स घेतल्या. 


टीम इंडियामध्ये अर्शदीप सिंहला डेब्यू करण्याची संधी पहिल्या टी 20 सामन्याच्या निमित्तानं मिळाली. अर्शदीपने 3.3 ओव्हरमध्ये 18 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. त्याची कामगिरी चांगली राहिली असली तरी त्याला पुढच्या दोन सामन्या खेळण्याची संधी रोहित शर्मा न देण्याची शक्यता आहे. 


अर्शदीप डेथ ओव्हरमधील स्पेशलिस्ट बॉलर आहे. त्याच्या जागी पुढच्या दोन सामन्यात जसप्रीत बुमराहला खेळण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे अर्शदीपला पुढच्या दोन सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवलं जाऊ शकतं. 


पाचव्या कसोटी सामन्यातील सगळ्या सीनियर खेळाडूंना पहिल्या टी 20 सामन्यासाठी आराम देण्यात आला होता. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्यात हे खेळाडू टीममध्ये परत येत असल्याने आता अजून कोणत्या खेळाडूंचा पत्ता कट होणार पाहावं लागणार आहे. अर्शदीपने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं होतं.