मुंबई : इंग्लंड विरू्द्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत नंतर आता रविंद्र जाडेजाने शतक ठोकले आहे. जाडेजाने 194 बॉल्समध्ये 104 धावा केल्या होत्या. परदेशात जाडेजाने प्रथमचं शतक ठोकले आहे. यावेळी त्याने आपल्या जून्याच स्टाईलमध्ये कंबरेतून तलवार काढून मैदानावर राजपूताना स्टाईलमध्ये तलवारबाजी करत शतक साजरे केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या दिवसअखेर भारताने 7 विकेट गमावून 338 धावा ठोकल्या होत्या. यामध्ये पंतने शतक ठोकत सर्वाधिक 146 धावा केल्या होत्या. आज दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीला रविंद्र जाडेजाने शतक ठोकले आहे. त्याने 194 बॉल्समध्ये 104 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 चौकार ठोकले आहेत. जाडेजाने आतापर्यंत तीन शतक ठोकले आहेत. इंग्लंड विरूद्ध जाडेजाने ठोकलेले हे शतक परदेशातले पहिले शतक आहे. तर इतर दोन शतक त्याने मायदेशात ठोकले होते.  मोक्याच्या क्षणी जाडेजाच्या बॅटीतून आलेले हे शतक भारतासाठी फार महत्वाचे आहे.



दरम्यान रविंद्र जाडेजा बाद झाला असून आता 9 विकेट गमावून 381 धावा झाल्या आहेत. एजबॅस्टन कसोटीची पहिली दोन सत्रे इंग्लंडच्या नावावर होती. मात्र तिसरे सत्र भारताने नावावर केले. भारताने केवळ 98 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. यानंतर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. पंतने सर्वाधिक 146 धावा केल्या. पहिल्या दिवशी रवींद्र जडेजा नाबाद ८३ आणि मोहम्मद शमी नाबाद परतले आहेत.