Ind vs Eng : भारताविरुद्ध पहिल्या २ टेस्ट सामन्यांसाठी इंग्लंड संघाची घोषणा
इंग्लंडच्या संघानेही दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे.
मुंबई : इंग्लंडबरोबर खेळल्या जाणार्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 19 जानेवारी रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. आता इंग्लंडच्या संघानेही दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर संघात परतला आहे. पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर जोस बटलर इंग्लंडला परत येईल आणि दुखापतीमुळे ओली पोपच्या जागी त्याची जागा घेतली जाईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना 5 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. गुरुवारी भारत दौर्यासाठी इंग्लंड संघाच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. याक्षणी इंग्लंडची टीम श्रीलंकेत आहे, तेथून ती भारतात पोहोचणार आहे.
वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि अष्टपैलू बेन स्टोक्स यांनी संघात पुनरागमन केलं आहे. या दोन्ही खेळाडूंना श्रीलंकेविरूद्ध खेळल्या जाणार्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. रॉरी बर्न्स भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघात परतला आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संघ निवडीसंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले की, जोफ्रा आर्चर, रोरी बर्न्स आणि बेन स्टोक्स यांचे संघात पुनरागमन झाले आहे. आर्चर आणि स्टोक्सला विश्रांती देण्यात आली होती, तर बर्न्स त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी घरी गेला होता.
इंग्लंडचा संघ
जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स अँडरसन, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॅक क्रोली, बेन स्टोक्स, टेन लॉरेन्स, जॅक लीच, डोम सिब्ली, बेन फॉक्स, ऑली स्टोन, ख्रिस वॉक्स
भारतीय संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मो. सिराज, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल.