Let`s Nacho! हार्दिकचा नताशा आणि मुलगा अगस्त्यासोबत धमाल डान्स, व्हिडीओ व्हायरल
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा वन डे सामना सुरू असतानाच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा वन डे सामना सुरू असतानाच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. वन डे सीरिजदरम्यानच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचं रोमँटिक फोटोशूट चर्चेत असतानाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या त्याची पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्यसोबत डान्स करताना दिसत आहे. तिघेजण मिळून डॉन्ट रश गाण्यावर तुफान डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ नताशानं आपल्या इन्स्टा अकाऊंटरवर शेअर करताच सोशल मीडियावर तो वेगानं व्हायरल झाला.
नताशा स्टानकोविच, हार्दिक पांड्या आणि अगस्त्य यांचा हा डान्सचा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. नताशा आणि हार्दिक सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या दैनंदिन आयुष्यातले अनेक खास क्षण हे आपल्या चाहत्यांसोबत शेअर देखील करत असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेल्या एका रोमँटिक फोटोची चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली होती.