IND vs ENG : वायफळ बडबड करणाऱ्या इंग्लंडला `जोर का झटका`, अखेर रोहित शर्माने सोडला सुटकेचा श्वास!
IND vs ENG Test series : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. डॅन लॉरेन्स (Dan Lawrence) याची भारताच्या कसोटी मालिकेसाठी हॅरी ब्रूकच्या जागी नियुक्ती करण्यात आलीये.
Harry Brook withdraws from Test series : आयपीएल 2024 पूर्वी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका (IND vs ENG Test series) खेळणार आहे. या टेस्ट सीरीजमधील पहिला सामना हैदराबादमधील (Hyderabad) राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअममध्ये (Rajiv Gandhi International Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. अशातच आता मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसलाय. इंग्लंडच्या स्टार फलंदाजाने माघार घेतल्याचं पहायला मिळतंय.
इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. हॅरी ब्रूक वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडला परतत असून कसोटी मालिका खेळण्यासाठी तो पुन्हा भारतात येणार नसल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी करून याची माहिती दिली. डॅन लॉरेन्स (Dan Lawrence) याची भारताच्या कसोटी मालिकेसाठी हॅरी ब्रूकच्या जागी नियुक्ती करण्यात आलीये.
कुणाचं पारड जड? (IND vs ENG Head to Head)
दोन्ही संघात आत्तापर्यंत 131 सामने खेळवले गेले आहेत. यातील फक्त 31 सामने भारताच्या पारड्यात पडलेत तर 50 सामन्यात इंग्लंडने आघाडी घेतलीये. तसेच उर्वरित 50 सामने अनिर्णत राहिलेत. दोन वर्षांपूर्वी म्हणजे शेवटचा कसोटी सामना जुलै 2022 मध्ये खेळला गेला होता. त्यावेळी विराट अँड कंपनीला पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच आता रोहित शर्मा विराटच्या पराभवाचा बदला घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ –
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक…
पहिली कसोटी : 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम)
दुसरी कसोटी : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वायएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरी कसोटी : 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
चौथी कसोटी : 23-27 फेब्रुवारी, रांची ( जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम)
पाचवी कसोटी : 7-11 मार्च, धर्मशाला (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)