जसप्रीत बुमराहचा संजनासोबत भन्नाट डान्स, संगीत सेरेमनीचा व्हिडीओ व्हायरल
भारतीय संघाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह नुकताच विवाहबंधनात अडकला. अँकर आणि प्रसिद्ध मॉडेल संजना गणेशन सोबत त्यानं नुकतेच सात फेरे घेतले आहेत. या दोघांच्या गोड जोडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुंबई: भारतीय संघाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह नुकताच विवाहबंधनात अडकला. अँकर आणि प्रसिद्ध मॉडेल संजना गणेशन सोबत त्यानं नुकतेच सात फेरे घेतले आहेत. या दोघांच्या गोड जोडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बुमराहनं मैदानात कायमच आपल्या कामगिरीनं सर्वांना आवडतो. आता तो डान्स करताना दिसत आहे. संगीत सेरेमनीदरम्यानचा त्याचा आणि संजनाचा एक व्हिडीओ बुमराहनं आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. त्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जसप्रीत या व्हिडीओमध्ये रोमँटिक डान्स करताना दिसत आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतून चौथ्या कसोटी सामन्या दरम्यान त्याने माघार घेतली होती. त्यानंतर आता त्याच्या लग्नाची गुड न्यूज समोर आली. बुमराहला त्यामुळे टी 20 सामन्यातूनही विश्रांती देण्यात आली. जसप्रीत बुमराहने अत्यंत खासगी स्वरुपात हा विवाह सोहळा केला. निवडक लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे.