Ind vs Eng: पंतने मोडला कोहलीचा विक्रम, कुलदीप यादवचा लाजीरवाणा रेकॉर्ड
दुसऱ्या वन डे सामन्यात श्रेयस अय्यर ऐवजी ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती.
मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिजमधील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या खेळवला जाणार आहे. नुकताच दुसरा सामना पार पडला. वन डे मालिकेत भारत आणि इंग्लंड संघांने 1-1 अशी बरोबरी केली आहे. इंग्लंड संघानं दुसऱ्या वन डेमध्ये 6 गडी राखून सामना जिंकला आहे.
दुसऱ्या वन डे सामन्यात श्रेयस अय्यर ऐवजी ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. ऋषभने चांगली कामगिरी करत कोहलीचा विक्रम तोडला तर दुसरीकडे कुलदीप यादवनं आपल्या खराब कामगिरीमुळे लाजीरवाणा रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेतला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वन डे सामन्या दरम्यान एक दोन नाही तर तब्बल 7 षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. या सामन्यात जास्त स्ट्राइक रेटनं धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम ऋषभ पंतनं मोडला आहे. दुसरीकडे कुलदीप यादवच्या 8 चेंडूवर 8 षटकार इंग्लंडच्या फलंदाजानं ठोकले. 2011 नंतर वन डे सामन्यात पुन्हा एकदा हा प्रकार कुलदीप यादवच्या चेंडूबाबत घडला आहे. 2013मध्ये विनय कुमारनं केलेल्या गोलंदाजीदरम्यान हा प्रकार घडला होता.
विराट कोहली कुलदीप यादवला प्लेइंग इलेवनमधून सुट्टी देणार का? कृणाल पांड्याचं तिसऱ्या वन डेमध्ये स्थान डळमळीत होणार का? युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरला संघात संधी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा वन डे सामना 28 मार्च रोजी दुपारी 1.30 वाजता पुण्यात खेळवण्यात येणार आहे.