IND vs ENG Rajkot Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला अन् मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली आहे. त्यामुळे आता एका सामन्यातील विजयासह टीम इंडिया (Team India) मालिका जिंकणार आहे. यशस्वी जयस्वालच्या डबल सेंच्यूरीमुळे टीम इंडियाने 557 धावांचं आव्हान इंग्लंडसमोर ठेवलं होतं. मात्र, मोठ्या फुगीरीत 600 धावा पण चेस करू म्हणणाऱ्या बेझबॉलची हवा निघाल्याचं दिसून आलं. परंतू, तुम्हाला माहितीये का? की या सामन्यात मोठा गैरसमज झाला होता. रोहित शर्माने (Rohit Sharma) डाव जाहीर केला नव्हता तरी देखील इंग्लंडचा संघाने मैदान सोडलं होतं. त्यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. अशातच आता या प्रकरणाता संपूर्ण व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय झालं?


टीम इंडियाचे फलंदाज सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल मैदानात फलंदाजी करत होते. सरफराजने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर त्यानंतर लगेच यशस्वीने द्विशतक पूर्ण केलं. तोपर्यंत टीम इंडियाने 500 हून अधिक धावांचा लीड घेतला होता. त्यामुळे रोहित शर्मा डाव जाहीर करेल, अशी शक्यता स्पष्ट दिसत होती. टीम इंडिया 412 धावांवर होती. तर 538 धावांचा लीड मिळाला होता. त्याचवेळी भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये हालचालींना वेग आला. रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी फिल्डिंगला जाण्यासाठी तयारी सुरू केली. यशस्वीचं द्विशतक, ड्रिंग्स ब्रेक आणि ड्रेसिंग रुममधील हालचाली एकाचवेळी सुरू झाल्याने टीम इंडियाने डाव जाहीर केला, असं समजलं गेलं. मात्र, रोहित शर्माने डाव जाहीर (Rohit sharma declare inning) केला नव्हता.


रोहित शर्माने ड्रेसिंग रुममधून बाहेर येताच, सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल यांना पुन्हा मैदानात जाण्याचा इशारा केला. त्याचवेळी इंग्लंडच्या संघ देखील ड्रेसिंग रुमकडे निघाला होता. मात्र, रोहितने इंग्लंडची फजिती केली आणि पुन्हा मैदानात परतण्यास सांगितलं. अंपायर देखील यावेळी कंन्फ्यूज झाले होते. मात्र, रोहितने डाव जाहीर न केल्याचं सांगितलं. त्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला अन् टीम इंडियाने 557 धावांची लीड घेतली होती.


पाहा Video



भारताने ही मालिका जिंकल्यास अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीतील पराभवानंतरची मालिका विजयाशी तुलना केली जाईल. त्याला कारण देखील तसंच आहे. मालिका भारतात असूनही रँक टर्नर खेळपट्टी बनवण्यात आली नाही. विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे मालिका खेळत नाही. तर केएल राहुलला मालिकेच्या मध्यातच दुखापत झाली. स्टार गोलंदाज मोहम्मद शमी देखील दुखापतीमुळे संघात नाही. तर स्टार विकेटकीपर ऋषभ पंत देखील संघाबाहेर आहे. त्यामुळे युवा चेहरे निवडून रोहित शर्माने नव्या छाव्यांसह मालिका जिंकल्यास रोहित शर्मांचं नाव कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अजरामर राहणार आहे.


WTC पाईंट्स टेबलमध्ये मुसंडी


तिसऱ्या सामन्यातील विजयामुळे भारताला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर जाण्यास मदत झाली. सलग दोन विजयानंतर टीम इंडियाने जोरदार मुसंडी मारली. सध्या टीम इंडियाने 7 मॅचमधील 4 विजयामुळे 50 अंक खिशात घातले आहेत. तर ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसलाय.