Ind vs Eng: `हा` धडाकेबाज खेळाडू प्लेइंग 11 मधून बाहेर, `या` दोघांना मिळणार संधी?
भारतीय संघात तीन मोठे बदल होणार आहे. ज्यामध्ये धडाकेबाज फलंदाजाला पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेवनमधून वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सीरिजदरम्यान भारतीय संघात अनेक मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. टी नटराजन दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे आपल्या गोलंदाजीमुळे प्रसिद्ध असलेला वरून चक्रवर्ती फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यानं संघामधून बाहेर झाला आहे. त्यामुळे आता भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सीरिजमधील पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेवनमध्ये कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
भारतीय संघात तीन मोठे बदल होणार आहे. ज्यामध्ये धडाकेबाज फलंदाजाला पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेवनमधून वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर दोन खेळाडूंना प्लेइंग इलेवनमध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही खेळाडूंनी भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी मालिकेत आपली दमदार कामगिरी दाखवली आहे.
भारतीय संघाचा विकेटकीपर ऋषभ पंत सध्या खूप चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे तो ओपनिंग फलंदाज असेल असा कयास आहे. 12 मार्चला होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात भारताकडून त्याला ही संधी मिळावी अशी सर्वांची प्रार्थना आहे.
Ind vs Eng: टी 20 आधी भारताला मोठा धक्का, फिटनेस टेस्टमध्ये गोलंदाज नापास
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिखर धवनची संघातून गच्छती होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांची जोडगोळी आजही लोकप्रिय असल्यानं पहिल्यांदा मैदानात ते दोघं उतरतील असं सांगितलं जात आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली स्वत: फलंदाजीसाठी उतरेल. सध्याची परिस्थिती पाहता विराट कोहली पांड्याला 6व्या क्रमांकावर उतरण्याची संधी देईल.
अशी असेल संभाव्य टीम
12 मार्चपासून सुरू होत असलेल्या टी 20 मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेवनमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची संभाव्य नावं पुढील प्रमाणे आहेत.
रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर , नवदीप सैनी और युजवेंद्र चहल
वॉशिंग्टन सुंदर अक्षर पटेलला पहिल्या सामन्यात संधी मिळू शकते. तर धवनकडून ही संधी हिरावण्यात येईल. त्यामुळे आता प्लेइंग इलेवनच्या फायनल यादीची सर्वांनाच खूप उत्सुकता आणि प्रतीक्षा आहे.