अहमदाबाद: इंग्लंड विरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत नुकताच 3-1नं विजय मिळवत भारतीय संघ WTCच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. या सीरिज पाठोपाठ आता 12 मार्चपासून भारत विरुद्ध इंग्लंड 5 टी 20 सामन्यांची मालिका सुरू होत आहे. या मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
भारतीय संघातील मिस्ट्री स्पिनर अशी ओळख असलेल्या गोलंदाज फिटनेस टेस्टमध्ये नापास झाला. त्यामुळे त्याला सामन्यासाठी खेळता येणार नसल्यानं भारतीय संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. खांदा आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे आधी टी नटराजन
टी 20 पहिला सामना खेळणार की नाही याबाबत शंका असताना आता आणखी एक गोलंदाज बाहेर गेला आहे.
वरून चक्रवर्ती बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये सलग फिटनेस टेस्ट देत होता. मात्र दोन्ही चाचण्यांमध्ये तो नापास झाला आहे. तर दुसरीकडे यॉर्कर स्पेशलिस्ट टी नटराजन जखमी असल्यामुळे टी 20 सीरिजच्या पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे.
7 वेगवेगळ्या पद्धतीनं गोलंदाजी करू शकतो वरूण
7 वेगवेगळ्या स्टाइलनं गोलंदाजी करता येत असल्याचा दावा वरून चक्रवर्तीनं केला आहे. ऑफब्रेक, लेगब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर, टॉपस्पिन, पायांच्या बोटाजवळ यॉर्कर बॉल टाकण्यात वरून तरबेज आहे. पण फिटनेस टेस्टमध्ये नापास होणं ही वरूनसाठी मोठी गोष्ट आह.
5 महिन्यांपूर्वी खेळल्य़ा गेलेल्या कामगिरीवर त्याची फिटनेसची पारख करता येणार नाही असा दावा टेस्ट घेणाऱ्यांचा आहे. त्यामुळे केवळ त्याची गोलंदाजी श्रेष्ठ असून उपयोग नाही तर त्याला फिटनेस टेस्टमध्ये देखील तितकच आपलं कौशल्य दाखवणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे वरून चक्रवर्ती संघातून बाहेर झाल्यानं भारतीय संघाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.